ICSE च्या 10 वी आणि ISC च्या 12 वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'इथे' पाहता येईल Result
ICSE 10th-12th Results 2025: आईसीएसई आणि आईएससी बोर्डाच्या 2025 वर्षातील निकाल 30 एप्रिल म्हणजेच आज जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थी आता त्यांचे निकाल अधिकृत वेबसाइट cisce.org आणि results.cisce.org ला थेट लिंकद्वारे भेट देऊन त्यांच्या मार्कशीट्स तपासू शकतात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ICSE आणि ISC बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर

निकाल पाहण्यासाठी कोणत्या वेबसाइटला भेट द्यावी?

ICSE आणि ISC चा निकाल कुठे आणि कसा पाहावा?
CISCE ISC, ICSE 10th-12th Results 2025 Out: आईसीएसई (ICSE) आणि आईएससी (ISC) बोर्डाच्या 2025 निकाल आज (30 एप्रिल) जाहीर करण्यात आला आहे. काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन (CISCE) आणि ICSE (इयत्ता 10 वी) आणि ISC (इयत्ता 12 वी) चे निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थी आता त्यांचे निकाल अधिकृत वेबसाइट cisce.org आणि results.cisce.org ला थेट लिंकद्वारे भेट देऊन त्यांच्या मार्कशीट्स तपासू शकतात.
ICSE परीक्षा 18 फेब्रुवारी ते 27 मार्च आणि ISE परीक्षा 13 फेब्रुवारी ते 5 एप्रिल 2025 या कालावधीत घेण्यात आल्या. बोर्डाच्या परीक्षेतील सर्व विद्यार्थी त्यांचा रोल नंबर आणि युनिक आयडीच्या मदतीने त्यांचा निकाल ऑनलाइन पाहू शकतात. याव्यतिरिक्त, शाळेच्या लॉगिनद्वारे देखील परीक्षेची मार्कशीट मिळवता येते.
रिझल्ट चेक करण्याच्या स्टेप्स:
1. सर्वप्रथम cisce.org या वेबसाईटवर जा.
2. ICSE किंवा ISC निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
3. लिंकवर जाऊन तुमचा परीक्षेतील रोल नंबर आणि यूआयडी (UID) टाका.
4. यानंतर 'Submit' वर क्लिक करा.
5. सबमिट केल्यामनंतर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल.
6. मार्कशीट डाउनलोड करण्यासाठी results.cisce.org अधिकृत वेबसाईटवर जा.
7. यामध्ये UID आणि रोल नंबर टाका.
8. 'Show Result' वर क्लिक करा आणि रिझल्ट डाउनलोड करा.
9. तुमच्या मार्कशीटची प्रिंट सुरक्षितरित्या ठेवा.
हे ही वाचा: अरे व्वा! आता अक्षय्य तृतीयेला सोन्याचे दर घसरले? 22 कॅरेटचे रेट काय?
SMS च्या माध्यमातून सुद्धा तपासू शकता
जर विद्यार्थ्यांना SMS द्वारे निकाल तपासायचा असेल तर ते त्यांच्या मोबाईलवरून विशिष्ट फॉर्मेटमध्ये मॅसेज पाठवू शकतात. याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे:
- ICSE (इयत्ता १०वी) च्या विद्यार्थ्यांनी ICSE टाइप करावे
- त्यानंतर एक स्पेस द्यावा.
- नंतर त्यांचा युनिक आयडी (UID) टाइप करावा आणि तो वर 09248082883 या नंबरवर पाठवावा.
- याच पद्धतीने, ISC (इयत्ता १२ वी) च्या विद्यार्थ्यांनी ISC टाइप करावे.
- स्पेस नंतर त्यांचा UID लिहावा.
- 09248082883 याच नंबरवर पाठवावा.
काही क्षणातच, निकालाची माहिती त्याच मोबाईल नंबरवर SMS द्वारे प्राप्त होईल.
हे ही वाचा: रक्ताच्या थारोळ्यात बाथरूममध्ये आढळला शिकाऊ डॉक्टरचा मृतदेह, सोलापूर पुन्हा हादरलं, घटना काय?
ही SMS द्वारे निकाल मिळवण्याची पद्धत विशेषतः अशा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे ज्यांच्याकडे मर्यादित इंटरनेट सुविधा आहे किंवा ज्यांचे निकाल वेबसाइटवर जास्त ट्रॅफिकमुळे लोड होत नाहीत.