अरे व्वा! आता अक्षय्य तृतीयेला सोन्याचे दर घसरले? 22 कॅरेटचे रेट काय?
Akshaya Tritiya: आज सोन्याच्या दरात थोडी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. याउलट, चांदीच्या दरात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. बघा, सोने आणि चांदीच्या दरांचे अपडेट्स.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सोन्याच्या दरात किती घसरण?

अक्षय्य तृतीयेला सोनं झालं स्वस्त

सोन्याच्या आणि चांदीच्या दराचे अपडेट्स
Gold Silver Price update: आता सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय. खरंतर, मंगळवारी दुपारी जे सोन्याचे दर जाहीर करण्यात आले त्यात सोन्याच्या किमतीत किंचित वाढ झाल्याचं समोर आलं. यामुळे गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. मात्र, हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. कारण मंगळवारी संध्याकाळ होताच जाहीर झालेल्या दरांनुसार 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा सुमारे 250 रुपयांनी घसरून 96011 रुपयांवर आला आहे. त्याच वेळी, चांदी 1000 रुपयांनी वाढून 97390 रुपये प्रति किलो झाली.
तज्ज्ञांच्या मते, कमकुवत जागतिक संकेतांमुळे सोन्याच्या किमती कमी होत आहेत. अक्षय्य तृतीयेनिमित्त सोने बाजारात ग्राहकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, स्टॉकिस्टांकडून नवीन खरेदीमुळे सोन्याच्या किमती वाढू शकतात. एप्रिलमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, सोन्याने आजपर्यंत प्रति तोळा 1 लाख रुपयांचा उच्चांक गाठला आहे. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये प्रति तोळा सोन्याचा दर 10 हजार रुपयांनी वाढला होता आणि तो सुमारे 5000 रुपयांपर्यंत खाली आला आहे. सध्या सोन्याचा दर 95 हजार ते 96 हजार रुपयांच्या आसपास आहे.
हे ही वाचा: सासू आधी जावयासोबत पळून गेली, आता म्हणतेय मला माझा नवराच हवा.. नेमकं प्रकरण काय?
लग्नाच्या हंगामात ग्राहकांसाठी मोठं टेन्शन
गेल्या दोन वर्षांबद्दल बोलायचे झाल्यास 2023 मध्ये सोन्याचा भाव सुमारे 65 हजार रुपये होता. सध्या ते 30 हजार रुपयांनी महाग झाले आहे. 2020 मध्ये सोन्याचा भाव सुमारे 49 हजार रुपये होता. म्हणजेच, गेल्या पाच वर्षांमध्ये सोने जवळपास दुप्पट महाग झाले आहे.
हे ही वाचा: अजित पवार निधी वाटणार, पण 'या' मंत्र्यांची सुद्धा नजर असणार, फडणवीसांची रणनीती काय?
काय आहे आजचा दर?
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने जाहीर केलेल्या आजच्या ताज्या दरांनुसार, प्रति तोळा सोन्याचा दर पुढीलप्रमाणे:
- 24 कॅरेट - 96011 रुपये
- 23 कॅरेट - 95627 रुपये
- 22 कॅरेट - 87946 रुपये
- 18 कॅरेट - 72008 रुपये
- 14 कॅरेट - 56166 रुपये
त्याच वेळी, चांदीचा दर प्रति किलो 97390 रुपये असल्याचं जाहीर करण्यात आलं.