घराबाहेर पाकिस्तानी लष्कर, 4 किमीपर्यंत सीसीटीव्हीची नजर, ड्रोनने पाळत! हाफिज अड्ड्याभोवती सुरक्षेचं कडं कसं?

मुंबई तक

हाफिज आणि लष्कर हे भारतासाठी सर्वात मोठा धोका आहेत. काश्मीर आणि इतर भागांमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याचं काम ते करतायत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हाफीज सईदच्या अड्ड्याभोवती सुरक्षेचं कवच

point

दूरदूरपर्यंत ड्रोनची नजर, पाकिस्तानी जवानांचा खडा पहारा

point

भारताने आक्रमक भूमिका घेताच तंबूत घबराट?

Pehalgam Attack News Update : दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईद सध्या पाकिस्तानात आहे. तिथे आता  त्याची सुरक्षा चार पट वाढवण्यात आल्याची माहिती आहे. कालच पाकिस्तानमधील लाहोरमध्ये एका गुप्त ठिकाणी लपलेला असल्याची माहिती समोर आली आहे. 

हाफिज लाहोरमधील जोहर टाउनमधील 116E या घरामध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी यंत्रणा ड्रोनने या जागेवर लक्ष ठेवून आहेत. हाफिज लपलेल्या जागेभोवती पाकिस्तानी सैनिक तैनात करण्यात आले आहेत. त्या ठिकाणाच्या चार किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे सीसीटीव्हीने सुसज्ज करण्यात आला आहे.

हे ही वाचा >> Maharashtra Day: मुंबईकरांनो 'अशी' बनलेली 'आपली मुंबई' महाराष्ट्राची राजधानी, ही कहाणी तुम्हालाही नसेल माहीत!

पहलगाम हल्ल्यानंतर, पाकिस्तानी सैन्य, आयएसआय आणि लष्करने हाफिज सईदला अतिरिक्त सुरक्षा कवच दिलं आहे. पाकिस्तानी सैन्य त्याच्या जवळच्या नातेवाईकांना आणि खास लोकांनाही सुरक्षा पुरवतंय. पाकिस्तानी सैन्याने त्यांना घराबाहेर न जाण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

यापूर्वी, हाफिज दाट लोकवस्ती असलेल्या लाहोरमध्ये त्याच्या कुटुंबासह आरामात राहत असल्याची माहिती समोर आली होती. उपग्रह छायाचित्र आणि व्हिडिओंवरून हाफिज सईदचं घर लाहोरमध्ये असल्याची माहिती मिळाी. या छायाचित्रांमध्ये हाफिजचे घर स्पष्टपणे दिसत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp