Beed Crime : बीडमध्ये एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विहिरीत संशयास्पद मृतदेह आढळून आला. काही दिवसांपासून मुलगी बेपत्ता होती. संबंधित प्रकरणात पोलिसांनी तपास केला असता, मुलीचे वर्षापूर्वी वडवाणी तालुक्यातील एका गावात तरुणाशी वयाच्या 16 व्या वर्षी बालविवाह झाला होता. त्यानंतर आता याच मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अशोक खरातचा सीडीआर कोणाकडून मिळाला? विरोधकांच्या आरोपांनंतर अंजली दमानियांचा खुलासा, डोळे पाणावले!
मुलगी बेपत्ता असल्याची वडिलांची पोलीस ठाण्यात तक्रार
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत मुलीचा वर्षभरापूर्वी विवाह झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतरचे पहिले सहा महिने ती सासरी होती, पण त्यानंतर ती कसारी येथील तिच्या माहेरी परतली. तीन दिवसांपूर्वी ती अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या वडिलांनी धारूर पोलीस ठाणे गाठून मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तपासादरम्यान, मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता.
वर्षभरापूर्वी विवाह झाल्याचा संशय
प्राथमिक तपासाचा अहवाल देत पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, मृत्यूवेळी मुलगी 17 वर्षे 10 महिन्यांची होती. यावरून लक्षात येतो की, 'तिचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. 'तिच्या लग्नाची पुष्टी केल्यानंतर तिचा बालविवाह असल्यास मुलीचे आई-वडील आणि सासू-सासरच्या मंडळींवर कठोर फौजीदारी कारवाई केली जाईल,' असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
हे ही वाचा : Astrology : केतूच्या नक्षत्रातील अडचणीत होणार वाढ, 'या' राशीतील लोकांनी सावधगिरी बाळगावी
मुलीच्या मृत्यूचे कारण, तिच्या माहेरी दिर्घकाळ राहण्याचे कारण समोर आलं नाही. हे प्रकरण आत्महत्या आहे की, हत्या याचा पोलीस दोन्ही बाजूने तपास करत आहेत.
ADVERTISEMENT











