Beed News : बीड जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर ज्ञानराधा बँक घोटाळ्यातील आरोपी सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांना घेऊन जाणाऱ्या एका व्हॅनचा भीषण अपघात झाल्याचं वृत्त आहे. या अपघातात व्हॅनने एका दुचाकीला धडक दिली असून या धडकेत दोघेजण गंभीर जखमी झाले. तर यापैकी एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहेत.मृत्य झालेल्या तरुणाचं नाव अमोल हांडके असून विक्रम हांडगे नामक तरूणावर उपचार सुरू आहेत. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 15 दिवसांपूर्वी पत्नीचं निधन, ठाकरेंचा शिलेदार खचला नाही, 30 वर्षांच्या संघर्षानंतर शिवसेनेने मुंबईतील 'हा' वार्ड जिंकला
येळंब घाट परिसरात व्हॅनने दुचाकीला दिली धडक
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बँकेतील सुमारे 3500 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सुरेश कुटे आणि अर्चना कुटे हे मुख्य आरोपी असल्याचं वृत्त आहे. या दोघांनाही सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. अशातच शनिवारी दुपारच्या सुमारास केज न्यायालयाने त्यांना बीडकडे घेऊन जाताना येळंब घाट परिसरात व्हॅनने दुचाकीला धडक दिल्याचं सांगण्यात येत आहे, अशातच दोघेजण गंभीरपणे जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
4 लाखांची गुंतवणूक केल्याचा फसवणुकीचा आरोप
या प्रकरणी बँक घोटाळ्यात कुटे या दाम्पत्यांनी सुमारे 4 लाखांची गुंतवणूक केल्याचा फसवणुकीचा आरोप करण्यात आल्याचं वृत्त आहे. बँकेतील निधी स्वत:च्या कुटे ग्रुपमधील विविध कंपन्यांना कर्जाच्या स्वरुपात वळवण्यात आल्याचं पोलीस तपासातून समोर आलं. या प्रकरणात मनी लाँड्रिंगचे आरोप असून ईडीने तपास सुरु केला आहे.
ADVERTISEMENT











