दिल्लीत झालेल्या स्फोटात भाजप नेत्याचा मुलगा जखमी, कुटुंबीयांनी सांगितली स्फोटाची कहाणी

Delhi blast news : दिल्ली स्फोटात भाजप नेत्याचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती तिच्या बहिणीने दिली आहे, नेमकी तिची बहीण नेमकं काय म्हणाली ते वाचाच.

 delhi blast

delhi blast

मुंबई तक

11 Nov 2025 (अपडेटेड: 11 Nov 2025, 04:46 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

दिल्ली स्फोटात भाजप नेत्याचा मुलगा गंभीर जखमी

point

जखमीच्या बहिणीने सांगितली आपबीती

Delhi Blast News : राजधानी दिल्लीत मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात अनेकांचे बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात अनेकजण गंभीर जखमी देखील झाल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या कारमध्ये हा स्फोट झाला होता, त्या कारचा चेंदामेंदा झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही घटना 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:33 वाजता घडली. या स्फोटाबाबत मोठ्या अपडेट्स समोर येऊ लागल्या आहेत. या स्फोटात भाजप महिला नेत्याचा मुलगा गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगर हादरलं! भररस्त्यातच 'त्या' एका कारणावरून आरोपीने तरुणाचा गळा चिरला, नंतर...

दिल्ली स्फोटात भाजप महिला नेत्याचा मुलगा गंभीर जखमी

भाजप महिला नेत्याचं नाव माया जयस्वाल असे आहे. त्या उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा मुलगा शिवा जयस्वाल हा दिल्लीतील कार स्फोटात गंभीररीत्या जखमी झाला आहे. शिवाचे कपड्याचे दुकान असून तो कपडे आणण्यासाठी दिल्लीला गेला असता, ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेची माहिती जेव्हा कुटुंबीयांना मिळाली असता, कुटुंबीय दिल्लीला रवाना झाले. 

जखमीच्या बहिणीने सांगितली आपबीती, म्हणाली की, आमचे वडील...

शिवा जयस्वालची बहीण रंजना जयस्वासने सांगितलं की, आमचे वडील हयात नाहीत. आई माया जयस्वाल ती भाजप नेता आहे, पण ती कॅन्सर पीडित आहे. त्यांना चार बहिणी देखील आहेत आणि सर्वच बहि‍णींचा विवाह झाला आहे. परिस्थिती पाहता, रंजनाने सांगितलं की, शिवा हा 9 नोव्हेंबर रोजी रात्री आपल्या उद्योगधंद्याच्या कामानिमित्त दिल्लीत आला होता. त्याची एक बहीण दिल्लीतील राहिवासी आहे. जेव्हा तो कपड्यांची खरेदी करत होता, तेव्हाच हा ब्लास्ट झाला. शिवा हा सध्या रुग्णालयात असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 

हे ही वाचा : कोल्हापूरात बिबट्याची दहशत, थेट पोलिसांवरच केला हल्ला, घटनेचा थरार व्हिडिओत पाहा

शिवा जयस्वालच्या बहिणीने सांगितलं की, आमचे वडील हयात नसून आई माया जयस्वाल भाजपच्या नेत्या आहेत. आई ही कॅन्सर पीडित असल्याची माहिती रंजनाने दिली आहे.  

    follow whatsapp