Shocking Love Story Viral News : उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. येथील एका महिलेनं पतीचा मृत्यू झाल्यानंतर दीरासोबत अफेअर सुरु केलं. दीराने तिला लग्नाचं वचन देत अनेकदा संबंध केले. त्यानंतर त्याने लग्नाला नकार दिला. आता महिलेनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना टडियावा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात घडली. 6 महिन्यांपूर्वी एका महिलेच्या पतीचा मृत्यू झाला होता. विधवा झाल्यानंतर दीराने तिच्यासोबत जवळीक वाढवली. वहिनी तू टेन्शन घेऊ नको, मी तुझ्याशी लग्न करेल, असं त्याने महिलेला म्हटलं. त्या महिलेनंही दीराच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.
अनेकदा संबंध केले अन्...
त्यानंतर दीराने त्याच्या वहिनीसोबत शारीरिक संबंध केले. दोघांमध्ये अनेकदा अनैतिक संबंध झाले. पण काही दिवसानंतर दीराचं मन बदललं. त्यानंतर मलिलेचा संशय वाढला आणि तिने दीरावर लग्नाचा दबाव वाढवला. तेव्हा दीराने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. नंतर त्याने महिलेला सांगितलं की, मी दुसऱ्या महिलेवर प्रेम करतो. तू मला विसरून जा. हे ऐकून त्या महिलेच्या पायाखालची जमीन सरकली. आधी पतीचा मृत्यू झाला अन् आता दीराने त्या महिलेला धोका दिला.
हे ही वाचा >> प्रेयसीसोबत सतत शारीरिक संबंध, गरोदर राहिली पण... पुण्यातील महिलेवर लैंगिक अत्याचार
पोलिसांत दाखल केली तक्रार
महिलेनं दीराला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो त्याच्या भूमिकेवर ठाम राहिला. त्यामुळे वैतागलेल्या महिलेनं टडियावा पोलीस ठाण्यात धाव घेतली. इथे महिलेनं तक्रार दाखल करत पोलिसांना सांगितलं की, दीराने फसवणूक करत अनेकदा तिच्यासोबत शारीरिक संबंध केले. आता दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करणार असल्याचं त्याने मला सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपी दीराविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे. तपास पूर्ण झाल्यावर पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
हे ही वाचा >> कॉलेजला सोडण्याच्या बहाण्याने विद्यार्थीनीला नेलं घरी, नंतर केलं लैंगिक शोषण, जर कोणाला सांगितलं तर....दिली धमकी
ADVERTISEMENT
