Instagram वरचा मित्र 12 वीत शिकणाऱ्या तरूणीला गेला घरी घेऊन आणि...
crime news : इयत्ता बारावीचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनीचं एका तरुणाने लैंगिक शोषण केलं. त्यानंतर तिच्यासोबत जे घडलं आहे ते कोणाला सांगितल्यास जीवं मारेन अशी धमकीही दिली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

तरुणाकडून विद्यार्थीनीचं लैंगिक शोषण

कारण ऐकून तुम्हीही चक्रावून जाल
Crime News : हरियाणातील सेनापतमध्ये इयत्ता बारावीचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनीचं एका तरुणाने लैंगिक शोषण केलं. दोघांचीही इंस्टाग्रामवर फ्रेंडशीप झाली होती. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर हे नात्यात झालं आणि दोघांमधील अधिकच संवाद वाढू लागला. त्यातूनच तरुणाने मैत्रीचा, नात्याचा गैरफायदा घेऊन तिचं लैंगिक शोषण केलं आहे. आरोपी तरुणाचं नाव हर्ष असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : काकानेच पुतण्यांवर चाकूने केले सपासप वार, एक गंभीर जखमी तर एकाचा जागीच मृत्यू, हादरून टाकणारी घटना
घटनेचा घटनाक्रम
सोमवारी, जेव्हा विद्यार्थीनी विद्यालयात जात होती, तेव्हाच प्रियकर हर्ष तिला तिच्या कॉलनीजवळ विद्यालयात सोडण्याच्या बहाण्याने आला. पण तिला विद्यालयात नेण्याऐवजी थेट त्याने आपल्या घरीच तिला नेलं. घरी कोणीही नसल्याची संधी साधून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला.
हा सर्व प्रकार घडल्यानंतर तिने पीडितेला कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. जर तु कोणाला काही सांगितल्यास, मारून टाकेन अशी धमकी देण्यात आली. या धमकीमुळे पीडित तरुणी ही अधिकच भयभीत झाली होती. ती घरी गेला असता, तिने घडलेला सर्व प्रकार हा आपल्या आई वडिलांना सांगितला.
त्यानंतर कुटुंबियांनी तातडीने पोलीस ठाणे गाठलं आणि नराधम्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी हर्षला अटक केली आहे. शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अरुण कुमार यांनी संबंधित प्रकरणात पुढील कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.