बुलढाणा हादरलं! पोटच्या लेकानं बापाचा केला खून, मृतदेह शेतात जाळला..

Buldhana Crime : बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं, ज्यात मुलानेच वडील बेपत्ता झाले असल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, तोच मुलगा खुनी असल्याचे समोर आले, लेकानं वडिलांची हत्या का केली याबाबतचं हे प्रकरण समजून घ्या.

Buldhana Crime

Buldhana Crime

मुंबई तक

20 May 2026 (अपडेटेड: 20 May 2026, 07:48 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बुलढाणा जिल्ह्यातील धक्कादायक प्रकरण उघडकीस

point

मुलानेच वडील बेपत्ता झाल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली

point

नंतर स्वत:च बापाच्या जीवावर उठला

Buldhana Crime : जका खान - बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं, ज्यात मुलानेच वडील बेपत्ता झाल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, तोच मुलगा खुनी असल्याचे प्रकरण समोर आले. संबंधित तरूणाची अनिकेत समाधान घायवट (वय 21) अशी ओळख समोर आली. तसेच मृत व्यक्तीचे नाव समाधान (वय 44) असल्याचे उघडकीस आले. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : अनैतिक प्रेमसंबंधाचा संशय, नवऱ्याने बायकोचा कोयत्याने गळा चिरला, रात्रभर मृतदेहाशेजारी..

लेकानं बापाला संपवलं

घडलेल्या घटनेनुसार, वडील हे गेल्या दोन दिवसांपासून घरी परतलेच नव्हते. पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींची तक्रार नोंदवून घेतली होती, नंतर तात्काळपणे तपासाला सुरूवात केली होती. तक्रार दाखल केल्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर पोलिसांनी पुन्हा तरूणाची चौकशी केली असता, त्याने आपणच वडिलांची हत्या केल्याच्या गुन्ह्यचा कबुलीनामा दिला. 

शेतात मृतदेह पेटवला 

जिल्ह्यातील हतेडि खुर्द गावातील रहिवासी असलेली मृत व्यक्तीच्या मुलीने पोलिसांना सांगितलं की, तिची आई लग्नसोहळ्यासाठी काही दिवस बाहेर गावी गेली होती. तेव्हा त्या तरूणाच्या वडिलांनी दारू पिण्याचा हट्ट धरला होता, तेव्हा मुलाने दारू पिण्यास नकार दिला होता. याच वादातून मुलानेच आपल्या वडिलांची हत्या केली. नंतर तिचा मृतदेह एका शेतात लाकडाखाली लपवून ठेवला आणि नंतर त्याला आग लावली. 

हे ही वाचा : शिवराज मोटेगावकरच्या पुण्यातील RCC कॅम्पसवर बुलडोझर कारवाई सुरुवात, दोन मालमत्ता सील

मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर, दोन दिवसांतच आरोपी मुलगा पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने तक्रार दाखल केली. त्याने पोलिसांना सांगितलं की, त्याचे वडील मित्रासोबत बाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले, दोन दिवसही उलटून गेले तरीही ते परतलेच नाही. बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या सखोल तपासातून ही हत्या असल्याचं उघडकीस आलं. आरोपी मुलाला अटक करण्यापूर्वी त्याच्याविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.