CBSE Board Class 10th Result 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. बोर्डाने दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. बारावी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही वेळातच दहावीचा निकालही जाहीर करण्यात आला.
ADVERTISEMENT
यंदा सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत मुलींनी चांगली कामगिरी केली आहे. मुलींचा उत्तीर्ण होण्याचा टक्का तब्बल 95% आणि मुलांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का 92.63% आहे. यावर्षी सीबीएसई दहावीच्या परीक्षेसाठी 23,85,079 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 23,71,939 विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसले आणि 22,21,636 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षी एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 93.66 एवढी आहे. या वर्षी निकाल गेल्या वर्षीपेक्षा 0.66 टक्के चांगला लागला आहे.
विद्यार्थी त्यांचे निकाल CBSE च्या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात
cbse.gov.in, results.cbse.nic.in द्वारे विद्यार्थी त्यांचा निकाल तपासू शकतील. याशिवाय, विद्यार्थ्यांना त्यांची डिजिटल मार्कशीट, पास सर्टिफिकेट आणि मायग्रेशन सर्टिफिकेट डिजीलॉकरवर देखील प्रदान केले जाईल. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर मिळालेल्या लॉगिन तपशीलांचा वापर करावा लागेल.
या वर्षी, सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या निकालात त्रिवेंद्रमच्या विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. येथे 99.79 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यानंतर विजयवाडा दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी देखील तितकीच आहे.
CBSE दहावीचा महाराष्ट्रातील निकाल किती?
महाराष्ट्रात यंदा CBSE दहावीचा निकाल हा तब्बल 96.60% एवढा लागला आहे. ज्यामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. या निकालात 97.34 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 96.06 टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रातून एकूण 1 लाख 17 हजार 237 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. ज्यापैकी 1 लाख 13 हजार 257 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
CBSE दहावीचा निकाल कसा पाहाल? (CBSE 10th Result Declared: How To Check)
स्टेप 1: निकाल तपासण्यासाठी, सीबीएसई निकालांची अधिकृत वेबसाइट results.cbse.nic.in किंवा cbse.gov.in सुरू करा.
स्टेप 2: यानंतर होम पेजवरील 'CBSE 10th Result Direct Link' वर क्लिक करा.
स्टेप 3: लॉगिन पेज उघडेल, येथे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख टाका
स्टेप 4: तुमचा सीबीएसई बोर्डाचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 5: विद्यार्थी येथून निकालाची डिजिटल प्रत डाउनलोड करू शकतील.
ADVERTISEMENT
