CBSE Board Result 2025 : सीबीएसई बोर्ड 12 वीचा निकाल कधी लागेल याची विद्यार्थ्यांना प्रतिक्षा होती. अशातच मंगळवारी 13 मे दिवशी 12 वीचा सीबीएसई बोर्ड निकाल 2025 जाहीर झाला आहे. यामध्ये केवळ राजस्थानच नाहीतर देशातून उत्कृष्ट गुण मिळवणाऱ्यांच्या यादीत खुशी शेखावत या विद्यार्थीनींच्या गुणांची एकच चर्चा होताना दिसत आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पुन्हा लातूर पॅटर्नचा डंका! राज्यात 211 विद्यार्थ्यांना 100 टक्के, त्यातले 113 जण एकट्या लातूरचे
राजस्थानमधील सीकर येथे प्रिन्स अकादमीची विद्यार्थीनी खुशी शेखावतने अव्वल स्थान पटकावले आहे. खुशीने 500 पैकी 499 गुण मिळवत भारतातील सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यांच्या यादीत आपलं नाव निश्चित केलं आहे.
खुशीने 12 वी सीबीएसई बोर्डात प्रत्येक विषयात उत्कृष्ट कामगिरी करत उल्लेखनीय गुण मिळवले आहेत. ज्यात इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, चित्रकला या विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. अशातच खुशाने इंग्रजी या विषयात 99 मार्क मिळवले आहेत. खुशीची कामगिरी पाहून अनेकजण तिचं कौतुक करत आहेत. तर काहींना तिच्या यशाकडे पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसला आहे.
खुशीने तिचे सर्व शिक्षण हे प्रिन्स अकॅडमी, सीकर येथून पूर्ण केले आहे. तिने नर्सरीपासून ते 12 वी पर्यंतचे शिक्षण येथूनच झाले आहे. खुशीचे कुटुंबाचेही यात महत्त्वाचे श्रेय आहे. खुशीचे वडील दिलीप सिंह शेखावत हे भारतीय सैन्यातून निवृत्त आहेत. तर आई संजु ही गृहिणीची भूमिका बजावते.
हेही वाचा : 10th Result Best of 5: दहावीचा निकाल.. 'बेस्ट ऑफ 5' म्हणजे नेमकं काय? गोंधळू नका सोप्प्या भाषेत समजून घ्या
खुशी मूळची ही ढोलस, लक्ष्मणगड आणि सीकर येथील रहिवासी आहे. सध्या ती आपल्या कुटुंबासह धोद रोड, सिकर येथे वास्तव्यास आहे. खुशीचे स्पप्न आहे की, भविष्यात भारतीय प्रशासकीय सेवेत सामील होऊन समाजाची सेवा करावी. खुशीचे हे यश केवळ सिकर जिल्ह्यासाठी नाही तर संपूर्ण राजस्थान आणि देशासाठी अभिमानास्पद आहे.
ADVERTISEMENT
