चंद्रपूर हादरलं! हॉस्टेलमध्ये मानसिक त्रास, अखेर 17 वर्षाच्या तरुणाने दोर आवळत संपवलं जीवन, 'त्या' चौघांचं नाव समोर

Chandrapur student suicide :  चंद्रपूरात मन हेलावून टाकणारी आत्महत्येची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील दाताळ रोडवरील एका शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहात सीईटी 11 वीच्या विद्यार्थ्याने गळफास घेत टोकाचं पाऊल उचललं आहे.

Chandrapur commits suicide

Chandrapur commits suicide

मुंबई तक

• 03:03 PM • 21 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

चंद्रपूरात धक्कादायक प्रकार

point

11 वी सीईटीच्या विद्यार्थ्यानं आयुष्य संपवलं

point

नेमकं काय घडलं?

Chandrapur student suicide : राज्यातील चंद्रपूरात मन हेलावून टाकणारी आत्महत्येची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील दाताळ रोडवरील एका शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहात सीईटी 11 वीच्या विद्यार्थ्याने गळफास घेत टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेनं पसिसर हादरून गेला आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव प्रथमेश सुदारी (वय 17) असे असून तो धानोरा पिंपरी येथील रहिवासी आहे. या प्रकरणी आता त्याचे वडील गुलाब विठूजी सुदारी यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुण्यात वहिणीसोबत दीराचे अनैतिक संबंध, भाऊच उठला भावाच्या जीवावर, धारदार शस्त्राने वार करत संपवलं, मृतदेह पोत्यात भरून...

तक्रारीत काय? 

वसतिगृहातील वॉर्डन आणि व्यवस्थापन कर्मचारी त्याला मानसिक त्रास देत होते. त्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वसतिगृहातील वॉर्डन लक्ष्मण रामाजी चौधरी, व्यवस्थापक प्रेमा झोटिंग, तसेच समुपदेशक विष्णुदार शरद ठाकरे आणि प्राचार्य आशिष कृष्णाजी महातळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणेबाबत तक्रारीत नोंद केली. 

आत्महत्येदिवशी तो लेक्चरला आलाच नाही... 

वृत्तमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश हा शहरातील जनता लाँचरमध्ये इयत्ता 11 वी मध्ये शिक्षण घेत होता. तो दाताळ रोड येथील वसतिगृहातील इतर तीन विद्यार्थ्यांसोबत एका खोलीत राहत होता. गुरुवारी सकाळी दोन विद्यार्थी आपल्या लेक्चरसाठी निघाले होते, परंतु प्रथमेश गेलाच नाही. तेव्हा त्याने गळफास, घेत आत्महत्या केली होती. लेक्चर संपल्यानंतर दोन्ही विद्यार्थी खाली आले असता, तेव्हा त्यांना मृतदेह पंख्याला  लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास केला. 

हे ही वाचा : सूर्य आणि बुध ग्रहाच्या युतीमुळे बुधादित्य राजयोगाची झाली निर्मिती, काही राशीतील लोकांना मिळणार बक्कळ पैसा

आत्महत्येचं कारण काय? 

विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीवरूनच चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि वॉर्डनला अटक करण्यात आली. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याचे तपासातून समोर आले. अद्यापही आत्महत्येचं कारण समोर आलेलं नाही.   

    follow whatsapp