पुण्यात वहिणीसोबत दीराचे अनैतिक संबंध, भाऊच उठला भावाच्या जीवावर, धारदार शस्त्राने वार करत संपवलं, मृतदेह पोत्यात भरून...

मुंबई तक

Pune Crime : पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या चुलत भावाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना आहे. बांधकाम साईटवर नेऊन धारदार शस्त्राने सपासप वार करत खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

ADVERTISEMENT

Pune Crime
Pune Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात भावानेच भावाचा केला खून

point

घटनेचा असा झाला उलगडा 

point

धारदार शस्त्राने वार करत मृतदेह पोत्यात भरला  

Pune Crime : पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या चुलत भावाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना आहे. बांधकाम साईटवर नेऊन धारदार शस्त्राने सपासप वार करत खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आणि मृतदेह पोत्यात भरून गुजरवाडी-निंबाळकरवाडी परिसरात डोंगराजवळ फेकून देण्यात आला. स्थानिकांनी पोत्यातील मृतदेहाबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत घटनेचा उलगडा समोर आणला. 

हे ही वाचा : सूर्य आणि बुध ग्रहाच्या युतीमुळे बुधादित्य राजयोगाची झाली निर्मिती, काही राशीतील लोकांना मिळणार बक्कळ पैसा

खून झालेल्या तरुणाचे नाव अजयकुमार गणेश पंडित (वय 22) असे आहे. तो तरुण मूळचा झारखंड येथील रहिवासी असून खून करण्यात आलेल्या आरोपीचं नाव अशोक कौलास पंडित (वय 35) असे आहे. पंडित कुटुंबाचे मूळ गाव झारखंड राज्यातील आहे. ते रोजगारासाठी पुण्यात आले होते. तेव्हा आरोपी अशोक पंडित आणि त्याचा चुलत भाऊ अजयकुमार पंडित हे दोघेही बांधकाम साईटवर मजूर म्हणून काम करत होते. 

 घटनेचा असा झाला उलगडा 

दरम्यान, अजयकुमारचे अशोकच्या पत्नीसोबत चॅट सुरु होते. दोघांमधील झालेले चॅट्स पती अशोक कुमारच्या हाती लागले.  त्यावरून समजले की पत्नी आणि चुलत भाऊ अजयकुमार यांच्यात अनैतिक संबंध आहेत. आरोपी अशोकच्या पत्नीने ही माहिती प्रियकर आणि चुलत दीर अजयकुमारला सांगितल्याने तो दोन-तीन दिवस साईटवरून फरार झाला होता. 

धारदार शस्त्राने वार करत मृतदेह पोत्यात भरला  

अशोक हा गेल्या काही दिवसांपासून अजयकुमारच्या शोधात होता. त्याला माहिती होते की, अजयकुमार हा एका कन्स्ट्रक्शन साइटवर राहतो. रात्री अंधाराचा फायदा घेत भाऊ अशोकने अजयकुमारवर धारदार शस्त्राने  सपासप वार करत खून केला. त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून भारती विद्यापीठ पोलीस हद्दीतील गुजरवाडी-निंबाळकरवाडी येथील जंगरात फेकून दिल्याची माहिती समोर आली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp