पकडणाऱ्यास 50 हजारांचं बक्षीस, कारनामे पाहून सिनेमा बनेल... चकवा देणाऱ्या प्रियांकाला पोलिसांनी कसं पकडलं?

मुंबई तक

priyanka singh : पकडणाऱ्यास 50 हजारांचं बक्षीस, कारनामे पाहून सिनेमा बनेल, चकवा देणाऱ्या प्रियांकाला पोलिसांनी कसं पकडलं?

ADVERTISEMENT

priyanka singh
priyanka singh
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पकडणाऱ्यास 50 हजारांचं बक्षीस, कारनामे पाहून सिनेमा बनेल

point

चकवा देणाऱ्या प्रियांकाला पोलिसांनी कसं पकडलं?

उत्तर प्रदेश एसटीएफने मोठी कारवाई कोट्यवधी रुपये लुटल्याप्रकणातील गुन्ह्यात फरार असलेल्या प्रियंका सिंह या महिलेला अटक केली आहे. तिला पकडून देणाऱ्यास पोलिसांनी 50 हजारांचं बक्षीस देखील जाहीर केलं होतं. ललितपुर पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली असून अनेक वर्षांपासून पसार असलेल्या आरोपीला पकडण्यात यश आले आहे.

प्रियंका सिंह कशी पकडली गेली?

एसटीएफला काही दिवसांपासून फरार आरोपी लखनऊ परिसरात सक्रिय असल्याची माहिती मिळत होती. तपास अधिक खोलवर गेल्यानंतर 2019 पासून वॉन्टेड असलेली आणि 50 हजारांची बक्षीस असलेली प्रियंका सिंह लखनऊच्या जानकीपुरम परिसरात लपून बसल्याचे समोर आले. त्यानंतर एसटीएफ आणि कोतवाली ललितपुर पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत बिहार सहारा स्टेट येथून तिला अटक केली.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर : ट्रॅव्हल्सच्या डिक्कीचा दरवाजा थेट रिक्षात घुसला,जीवलग मैत्रीणींचा गळा कापल्या गेल्याने मृत्यू

चौकशीत प्रियंकाने काय सांगितले?

प्राथमिक चौकशीत प्रियंकाने कबुली दिली की, 2011 मध्ये तिने पती राजेश कुमार सिंह आणि सहकारी दीपक शुक्ला, आशीष श्रीवास्तव, दुर्गेश जायसवाल आणि विक्रांत त्रिपाठी यांच्या सोबत मिळून ‘जेकेबी लँड अँड डेव्हलपर्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ या नावाने कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी अनेक शाखांसह गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे काम करीत होती. कंपनीचे रजिस्टर्ड ऑफिस हजरतगंज, लखनऊ येथे तर शाखा ललितपुर येथे होती. एजंट नेमून गुंतवणूकदारांकडून करार केले जात होते आणि त्यांच्या नावाने एफडी व बँक खाती उघडली जात होती. या माध्यमातून गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये जमा करण्यात आले.

हे वाचलं का?

    follow whatsapp