Today Shocking Viral News : उत्तरप्रदेशच्या झांसी जिल्ह्यात एका अपघातात तरुणीचा मृत्यू झाला होता. तसच तिचा प्रियकर गंभीररित्या जखमी झाला आहे. दोघेही लपून फिरायला जायला निघाले होते, तेव्हा हा अपघात घडला, असं बोललं जात आहे. पोलिसांनी तरुणीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT
काय आहे संपूर्ण प्रकरण?
ही धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी झांसीच्या बडागाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत विद्यावती कॉलेजच्या परिसरात घडली. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. तरुणी तालपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नवाबाद येथील रहिवासी आहे. तर जखमी तरुणाचं नाव अल्ताफ असून तो तालौड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शाहजहांपूर येथील रहिवासी आहे.
हे ही वाचा >> कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरात दोन्ही गटात तुफान राडा, आधी दगडफेक नंतर वाहनंच पेटवली, पुरोगामी महाराष्ट्राला कोणाची नजर लागली?
अपघातात जखमी झालेल्या अल्ताफला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. अल्ताफने म्हटलं की, तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बाहेर फिरायला निघाला होता. तेव्हा मागून येणाऱ्या एका ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली. दोघेही दोन वर्षांपासून मित्र होते आणि एकत्र फिरायची आता संधी होती. तरुणीने त्याला फोनकरून बोलावलं होतं, असंही त्याने म्हटलं.
कुटुंबाला नंतर माहित झालं आणि..
मृताचा भाऊ रितीक आणि वडील पूरनने दिलेल्या माहितीनुसार, ते शुक्रवारी सांयकाळी घरी पोहोचले, तेव्हा त्यांची मुलगी घरी नव्हती. तपास केल्यानंतर माहित झालं की, ती कुठेतरी बाहेर गेली आहे. त्यानंतर त्यांना या अपघाताबाबत कळलं आणि रुग्णालयात पोहोचल्यावर त्यांना समजलं की, तिचा मृत्यू झालाय.
हे ही वाचा >> विकृतीचं टोक! अल्पवयीन मुलीवर बलात्कार अन् जेल, चौदा वर्षानंतर आला बाहेर अन् दुसऱ्याच पीडितेवर...सुरूच खेळ
अल्ताफने तरुणीला फुस लावून बाहेर नेल्याचा आरोप मृत तरुणीच्या कुटुंबियांनी केला आहे. बडागाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी संजय गुप्ता यांनी म्हटलं की, जखमी झालेल्या तरुणाला मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर तरुणीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी मॉर्चरीला पाठवण्यात आला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
