Husband And Wife Shocking News : उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. येथील दोन महिलांनी त्यांच्या पतीला धोका देऊन त्या फरार झाल्या. दोन्ही भावांना पत्नीनं सोडल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दोन महिलांनी काही वर्षांपासून इन्स्टाग्राम अकाऊंटवर तरुणांसोबत मैत्री करणं, त्यांच्याशी फोनवर बोलणं अशाप्रकारचं कृत्य सुरु केलं होतं. 21 ऑगस्ट रोजी दोन्ही महिला घरातून अचानक फरार झाल्या. त्यानंतर पीडित भावांनी मडियांव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करत पत्नींवर गंभीर आरोप केले.
ADVERTISEMENT
ही धक्कादायक घटना फैजुल्लागंज परिसरात घडली. येथील गोंडा जिल्ह्यातील दोन भाऊ भाड्याच्या घरात राहतात आणि रिक्षा चालवून कुटुंबाचं उदरनिर्वाह करतात. मोठ्या भावाचं लग्न 9 वर्षांपूर्वी गोरखपूर येथील एका तरुणीसोबत झालं होतं. तिला दोन मुलं आहेत. छोट्या भावाची पत्नीही त्याच परिसरातील रहिवासी आहे. पीडित व्यक्तींनी आरोप केला आहे की, त्यांच्या पत्नी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अनोळखी तरुणांसोबत बोलायच्या. त्यानंतर हळूहळू त्यांच्यात प्रेमसंबंध सुरु झाले.
हे ही वाचा >> बीड पुन्हा हादरलं! बॉयफ्रेंडसाठी दोन मैत्रिणींमध्ये रंगला खुनाचा थरार! एकीने होमगार्ड महिलेला संपवलं, मृतदेह नाल्यात फेकला अन्...
इन्स्टाग्रामवर चॅटिंगने सुरु झालं प्रकरण अन्...
पीडित मोठ्या भावाने म्हटलंय की, त्याच्या पत्नीनं इन्स्टाग्रामवर अनोळखी तरुणासोबत मैत्री केली. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. तिने नातेवाईकांना मदत व्हावी म्हणून, माझ्याकडे पैशांची मागणी सुद्धा केली होती. पण काही दिवसांनी मला संशय आला की, पत्नी अन्य कोणाला तरी पैसे देत आहे. छोट्या भावाची पत्नी अन्य पुरुषासोबत बोलायची.
21 ऑगस्ट रोजी दोन्ही महिला औषध घेण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडल्या. कोणालाच काही न सांगता त्या त्यांच्या माहेरी गोरखपूरला गेल्या. पीडित व्यक्तीचं म्हणणं आहे की, त्याची पत्नी त्या रात्री कुठे गायब झाली होती, याची कोणतीच माहिती नाही. त्यांनी अनेक गंभीर आरोप लावत पत्नींच्या चारित्र्याबाबत प्रश्न उपस्थित केले. पीडितेचं म्हणणं आहे की, सासरच्यांनी त्यांना गोरखपूरला बोलावलं आहे आणि तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला. दरम्यान, पोलिसांना प्राथमिक तपासात माहिती मिळाली की, दोन्ही महिला त्यांच्या माहेरी गोरखपूरला गेल्या आहेत. पीडित व्यक्तींनी केलेल्या गंभीर आरोपानंतर पोलिसांनी याप्रकरणी कारवाईची पावलं उचलली.
हे ही वाचा >> Govt Job: आता मुंबई हायकोर्टात मिळवा नोकरी... 'या' पदांसाठी निघाली भरती! कधीपर्यंत कराल अर्ज?
ADVERTISEMENT
