Maharashtra Weather : भारतीय हवामान खात्याच्या (IMD) विभागाने, 21 ऑगस्ट रोजी राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होणार असल्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. गेल्या 24 तासांत मुंबई, पुणे, रायगड आणि कोकणातील काही भागात अतिवृष्टीमुळे 250 मिमीपेक्षा पावसाची नोंद अधिक आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : ‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्ये जोडली तरी..' भाजप नेत्यानं ठाकरेंना डिवचलं
कोकण :
कोकणातील मुंबई आणि ठाणे परिसरात 21 ऑगस्ट रोजी अंशतः ढगाळ वातावरण राहील, तसेच काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग 45-55 किमी प्रतितास राहील असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. ज्यामुळे किनारपट्टीवर खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
तसेच दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूरातील घाटमाथ्यावरील भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यासह आणि पुणे घाट परिसराला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला होता, परंतु आता ऑरेंज अलर्ट असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
विदर्भ आणि मराठवाडा :
विदर्भात नागपूर, अमरावती आणि चंद्रपूर येथे हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि परभणी परिसरात आकाश ढगाळ राहील, परंतु पावसाची तीव्रता कमी असेल.
हे ही वाचा : शेतात काम करताना विजेचा धक्का, दोन चिमुरड्यांसह अख्ख कुटुंब उद्ध्वस्त, जळगावात हळहळ
उत्तर महाराष्ट्र :
उत्तर महाराष्ट्रात दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि नंदुरबारच्या घाट परिसरात ऑरेंज अलर्ट असून, मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
