शेतात काम करताना विजेचा धक्का, दोन चिमुरड्यांसह अख्ख कुटुंब उद्ध्वस्त, जळगावात हळहळ

Jalgoan news : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वरखेडी गावात मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना उघडकीस आहे. एकाच घरातील पाच सदस्यांना विजेच्या तारांचा धक्का लागून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Jalgoan news
Jalgoan news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जळगावात हळहळ

point

विजेच्या धक्क्याने कुटुंबा उद्ध्वस्त

point

नेमकं शेतात काय घडलं?

Jalgoan news : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वरखेडी गावात मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना उघडकीस आहे. एकाच घरातील पाच सदस्यांना विजेच्या तारांचा धक्का लागून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत झालेल्यांमध्ये आई, पती-पत्नी, दोन मुलांचा समावेश आहे. ही घटना वरखेडी गावातील शेतात घडली असून अख्ख कुटुंबंच उद्ध्वस्त झालं आहे. या घटनेनं तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना बुधवार दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडली आहे. 

हे ही वाचा : 'माझ्यासोबत झोपायला चल...' पतीची पत्नीकडं मागणी, पत्नीनं दिला नकार अन् नंतर कुऱ्हाडीनेच तोडलं

एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

मृत्यू झालेल्यांमध्ये रामलाल पावरा (वय 35), पत्नी सुमन विकास पावरा (वय 30), त्यांची दोन मुले पवन पावरा, कंवल पावरा तसेच आजीचा या विजेच्या अपघातात मृत्यू झाला आहे. 

दरम्यान, मृत व्यक्ती ही मध्य प्रदेशातील असल्याची माहिती समोर आली आहे. पिकांचं प्राण्यांपासून संरक्षण व्हावं यासाठी शेतकऱ्याने कुंपण घालून दिलं होतं. त्याच कुंपणात  वीज प्रवाह सोडला असता, आता शेतमालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संबंधित मृतदेह हे एका रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.  

हे ही वाचा : ‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्ये जोडली तरी..' भाजप नेत्यानं ठाकरेंना डिवचलं

विरखडे गावात हळहळ 

या घटनेनं विरखडे गावात शोक व्यक्त केला जात आहे. या दुर्दैवी घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थानी घाव घेतली. कायदेशीर तक्रार केली असता, पोलीस पुढील तपास करत पंचनामा करत आहेत.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp