2 मित्रांनी केली बायकांची अदला-बदली अन्...! हा प्रकार आहे तरी काय?

Couple Shocking Viral News :  उत्तरप्रदेशच्या बाराबंकी येथे एक खळबळजनक घटना घडली. येथील एका तरुणाने पत्नीला त्याच्या मित्राकडे सोडलं आणि मित्राच्या पत्नीला स्वत:सोबत घेऊन आला.

Wife swapping shocking incident happened in barabanki uttar pradesh couple viral news

प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok

मुंबई तक

20 Aug 2025 (अपडेटेड: 24 Aug 2025, 10:33 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

काय आहे संपूर्ण प्रकरण?

point

मित्राच्या पत्नीशी जवळीक साधली अन्...

point

पोलिसांनी काय म्हटलं?

Couple Shocking Viral News: उत्तरप्रदेशच्या बाराबंकी येथे एक खळबळजनक घटना घडली. येथील एका तरुणाने पत्नीला त्याच्या मित्राकडे सोडलं आणि मित्राच्या पत्नीला स्वत:सोबत घेऊन आला. तरुणाने जबरदस्ती त्याच्या पत्नीला मित्राकडे पाठवलं. आता याप्रकरणी पोलिसांच्या मदतीची मागणी केली जात आहे. हे प्रकरण ऐकून पोलिसांनाही धक्काच बसला आहे.

हे वाचलं का?

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पीडितेचं म्हणणं आहे की, तिचं लग्न जवळपास दोन महिन्यांपूर्वी बादल नावाच्या व्यक्तीसोबत झालं होतं. सुरुवातीला सर्वकाही ठीक होतं. पण काही दिवसानंतर पतीने मारहाण केली आणि तिला माहेरी सोडलं. काही महिन्यांपूर्वी पतीने तिला सासरी पुन्हा परत बोलावलं. पीडितेनं म्हटलं की, जेव्हा ती सासरी परत आली, तेव्हा पतीनं तिच्यावर दबाव टाकला की, तिने त्याच्या मित्रासोबत पत्नी बनून राहावं. जेव्हा तिने याचा विरोध केला, तेव्हा पतीने तिच्यासोबत मारहाण केली.

हे ही वाचा >> मुंबईची खबर: मॉल म्हणावं की स्विमिंग पूल? नागरिकांनी रस्त्यावरच मारल्या बेडूक उड्या..ओबेरॉय मॉलची 'अशी' अवस्था कधी पाहिली नसेल

मित्राच्या पत्नीशी जवळीक साधली अन्...

ज्या मित्राच्या पत्नीला बादल त्याच्यासोबत घेऊन गेला. त्यानेही याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तरुणाचं म्हणणं आहे की, तो बाहेर नोकरी करतो. त्याचदरम्यान, त्याचा मित्र बादल, त्याच्या पत्नीसोबत जवळीक साधत होता. त्याने मागील चार महिन्यांपासून त्याच्या पत्नीला सोबत ठेवलं आहेत. तरुणाचं असंही म्हणणं आहे की, बादलने त्याच्या पत्नीला त्याच्याजवळ जबरदस्ती पाठवलं होतं. 

पोलिसांनी काय म्हटलं?

या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलीस अधिकारी अभय कुमार मोर्या यांनी म्हटलं, या प्रकरणाचा तपास सुरु आहे. एका पक्षाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही तरुणांविरोधात 151 अंतर्गत कारवाई केली आहे. बादल आणि त्याची प्रेयसी (मित्राची पत्नी) खुश आहे. पण बादलचा मित्र आणि बादलची पत्नीनं न्यायाची मागणी केली आहे. 

हे ही वाचा >> हत्तीनं तुडवल्यानं पतीचा झाला मृत्यू! पतीच्या 6 बायकांनी मागितली भरपाई..वन विभागाची झोपच उडाली, घडलं तरी काय?

    follow whatsapp