मुंबईची खबर: मॉल म्हणावं की स्विमिंग पूल? नागरिकांनी रस्त्यावरच मारल्या बेडूक उड्या..ओबेरॉय मॉलची 'अशी' अवस्था कधी पाहिली नसेल
मुंबईच्या गोरेगावमधील ओबेरॉय मॉलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारल झाल्याचं निदर्शनास येत आहे. मॉलमध्ये सर्वत्र पाणी असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

बातम्या हायलाइट

मुसळधार पावसामुळे गोरेगावच्या ऑबेराय मॉलला स्विमिंग पूलचं स्वरूप

व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया...
Mumbai News: सध्या, महाराष्ट्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईला झोडपलं असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, मुंबईच्या गोरेगावमधील ओबेरॉय मॉलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारल झाल्याचं निदर्शनास येत आहे. मॉलमध्ये सर्वत्र पाणी असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. मजेशीर बाब म्हणजे, काही लोक त्या पाण्यात पोहत असल्याचं देखील दिसत आहे, जणू काही ते एक वॉटर पार्कच झालं आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की रस्ता पूर्णपणे पाण्याने भरला आहे आणि त्यात काही मुले पोहत आहेत. एका यूजरने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. काही वेळातच हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आणि या व्हिडीओने लोकांचं लक्ष वेधून घेतलं.
लोकांच्या प्रतिक्रिया
मुंबईतील गोरेगावमध्ये पावसामुळे पूर आल्याचं पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडिओ समोर येताच त्याला प्रचंड व्ह्यूज मिळाले आणि मुंबईच्या इतक्या पॉश भागात देखील असं घडत असल्याबाबत लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. अनेकांना ही गंमतीशीर बाब वाटली तर काहींनी हे भ्रष्टाचारामुळे घडत असल्याचं म्हटलं. एका नेटकऱ्याने तर हे गंगा घाट हरिद्वार सारखं दिसत असल्याचं लिहिलं.
हे ही वाचा: आली लहर केला कहर... भर पुराच्या पाण्यात टेबल टाकून मद्यपान करणाऱ्या काकांची जोडी! Video प्रचंड व्हायरल
दुसऱ्या एका युजरने गंमतीशीर पद्धतीत लिहिले की “तुमचे सरकार तुम्हाला मोफत स्विमिंग पूल देत आहे आणि तुम्ही अजूनही त्यांचे आभार मानत नाही आहात.” तर एकाने लिहिले की “फक्त 2 दिवसांच्या पावसात जगातील दोन मोठी शहरं बुडाली... आम्ही तरी ठीक आहोत.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “भाऊ, ही मुंबई आहे आणि ती स्वच्छ असली पाहिजे, तिची ड्रेनेज व्यवस्था जागतिक दर्जाची असली पाहिजे आणि यासाठी कोणताही बहाणा नाही, सॉरी.” तर तिसऱ्याने लिहिलं, मुंबईतील बीएमसीचे बजेट 74427 हजार कोटी आहे आणि वाराणसीचे बजेट 1568 कोटी आहे, तरीही ते स्वच्छ आहे. कधीतरी इथे ये, भाऊ, मी तुला फिरवून दाखवतो.”
हे ही वाचा: आई आणि मुलगा चालवायचे सेक्स रॅकेट, नागपूरमधील भाड्याच्या घरात अवैध व्यवसाय! पैशाचं आमिष दाखवून मुलींना...
प्रशासनाचा सल्ला
मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाचा इशारा असल्याकारणाने शहरातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल ट्रेनची वाहतूक उशिरा सुरू होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.