Elephant Attacked A Man Viral News : छत्तीसगढच्या जशपूरमध्ये एका धक्कादायक प्रकरणाची तुफान चर्चा रंगलीय. येथे हत्तीच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. जेव्हा त्या मृत व्यक्तीला भरपाई देण्याची वेळ आली, तेव्हा वन विभाग टेन्शनमध्ये आला होता. कारण 6 महिला दावा करत आहेत की, मृत व्यक्ती त्यांचा पती होता. अशातच भरपाई कोणाला द्यायची, असा प्रश्न वन विभागाला पडला आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेला वनविभागाने आदेश दिला आहे की, त्यांनी लग्नासंबंधीत एखादं प्रमाणपत्र सादर करावं. जेणेकरून मृत व्यक्तीची पत्नी कोण आहे, हे यावरून सिद्ध होईल.
ADVERTISEMENT
हे धक्कादायक प्रकरण बालाझर चिमटा पानी गावातील आहे. येथे काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. सालिक टोप्पो असं मृत व्यक्तीचं नाव होतं. त्याच्या कुटुंबियांना सरकारच्या माध्यमातून भरपाई मिळणार आहे. पण ही भरपाई घेण्यासाठी सालिक टोप्पोच्या 6 पत्नी आणि त्यांची मुलं वन विभागाच्या कार्यालयात पोहोचले, त्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
हे ही वाचा >> आली लहर केला कहर... भर पुराच्या पाण्यात टेबल टाकून मद्यपान करणाऱ्या काकांची जोडी! Video प्रचंड व्हायरल
वन विभागाच्या कार्यालयात पोहोचलेल्या सर्व 6 महिला, स्वत:ला सालिक टोप्पोची पत्नी असल्याचं सांगतात. सालिकची खरी पत्नी नेमकी कोण आहे, वनविभागाचा असा गोंधळ उडाला होता. सालिकने वेगवेगळ्या ठिकाणी सहा महिलांशी लग्न केलं होतं, असं म्हटलं जात आहे. तो प्रत्येक महिलेसोबत 2-3 वर्ष राहिला आणि त्याचदरम्यान त्याला मुलंही झाली.
प्रमाणपत्र आणण्यासाठी सांगण्यात आलं
मृत व्यक्तीच्या सर्व पत्नी वन विभाग ऑफिसमध्ये पोहोचल्या आणि त्यांनी भरपाईची मागणी केली. या महिलांनी दावा केला की, त्या लवकरात लवकर प्रमाणपत्र सादर करतील. ज्यामुळे त्या सालिक टोप्पोची पत्नी आहे, हे सिद्ध होईल.
हे ही वाचा >> ‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्ये जोडली तरी..' भाजप नेत्यानं ठाकरेंना डिवचलं
वन विभागाने काय म्हटलं?
याप्रकरणी वन विभागाच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं, हत्तीच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीला भरपाई देण्याची प्रक्रिया सुरु आहे. मृत व्यक्ती सालिक टोप्पोची भरपाई घेण्यासाठी 6 बायका त्यांची मुलं आणि जावयासोबत पोहोचली. सर्वांनी भरपाईची मागणी केली. पंचायतीच्या सरपंचाच्या परवानगी नंतर पंचनामा करून पुढील कार्यवाही केली जाईल.
ADVERTISEMENT
