Strange Love Story: प्रेमाला वयाचं बंधन नसल्याचं म्हटलं जातं. बिहारच्या भागलपुरमध्ये अशीच एक अनोखी प्रेमकथा पाहायला मिळाली. येथे 18 वर्षीय तरुणाने एका 50 वर्षीय महिलेसोबत प्रेमविवाह केल्याची चकित करणारी बातमी समोर आली आहे. संबंधित महिलेला आधीच चार मुलं आणि नातवंडे देखील आहेत. तरी देखील तो तरुण आपल्याहून 23 वर्षे मोठी असलेल्या महिलेला लग्न करून घरी घेऊन आला.
ADVERTISEMENT
संबंधित तरुण गुजरातमध्ये मजूर म्हणून कामाला होता. यादरम्यान, त्याची ओळख ज्योती देवी नावाच्या महिलेशी झाली. त्यांच्यातील नात्याचं प्रेमात रुपांतर झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
50 वर्षीय महिलेसोबत प्रेमविवाह
भागलपूर जिल्ह्यातील घोघा पोलीस स्टेशन परिसरातील पक्कीसराई गावातील रहिवासी कन्हाई कुमार (18) याने 50 वर्षीय महिलेसोबत प्रेमविवाह केला. सध्या, हे लग्न परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. दोघांचही एकमेकांवर प्रेम जडलं आणि कुटुंबियांचा विचार न करता दोघांनी पळून जाऊन लग्न केलं.
हे ही वाचा: ‘ती’ 40 मिनिटं… महाराष्ट्राचं राजकारण बदलणार? राज ठाकरे-फडणवीसांची बंद दाराआडची चर्चा अन्..
लग्न करून घरी घेऊन आला...
कुटुंबियांच्या विरोधात लग्न केल्यानंतर, अवघ्या 3 दिवसांपूर्वी तो तरुण त्या महिलेला पक्कीसराई येथील त्याच्या घरी घेऊन गेला आणि आश्चर्याची बाब म्हणजे संबंधित महिलेला चार मुलं, तीन मुली आणि एक मुलगा आहे. इतकेच नव्हे तर, तिला नातवंड देखील असल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित महिला तिचा पती हिरालाल मंडल आणि मुलगा आलोक कुमार यांच्यासोबत गुजरातमध्ये राहत होती. कन्हाई सुद्धा तिच्या घराजवळच राहत होता. या प्रकरणासंबंधी महिलेच्या मुलीने आणि जावयाने घोघा पोलिस ठाण्यात अर्ज दाखल केला असून तिच्या आईला घरी परत आणण्याची विनंती करण्यात आली आहे.
हे ही वाचा: महाराष्ट्राच्या राजकारणातील नवा डाव, राज ठाकरे-फडणवीस यांची भेट.. अजित पवार एवढे सावध का?
महिलेनं कुटुंबियांच्या म्हणण्याला दिला नकार...
दोघांनी पळून जाऊन लग्न केल्याची माहिती मिळताच महिलेच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. बराच काळ शोध घेतल्यानंतर शनिवारी महिलेचे कुटुंबीय तिचा प्रियकर कन्हाई मंडल याच्या पक्कीसराई गावात पोहोचले. तिथे जाऊन कुटुंबियांनी या लग्नाला विरोध दर्शवला. कुटुंबियांच्या हट्टामुळे गावात पंचायत बोलावण्यात आली, परंतु प्रेमात बुडालेल्या महिलेने कुटुंबियांच्या म्हणण्याला नकार दिला आणि ती तिथून निघून गेली.
ADVERTISEMENT
