Maharashtra Weather : भारतीय हवामान खात्याने (IMD) राज्यातील 22 ऑगस्ट रोजी हवामानाविषयी अंदाज वर्तवला आहे. राज्यात मान्सूनचा जोर काहीअंशी प्रमाणात कमी झाला आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पावसाचे प्रमाण सक्रिय आहे. पश्चिम महाराष्ट्राला हवामान विभागाने येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबई हादरली! नवऱ्याला बायकोसोबत एकांत मिळेना, मुलगी यायची सतत नात्याच्याआड, नंतर गळा दाबून मृतदेह फेकला समुद्रात
कोकण :
कोकण भागातील पालघर, रायगड आणि रत्नागिरीसाठी हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.वातावरण ढगाळ राहील, तसेच मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असेल असा हवामान विभागाने अंदाज जारी केला.
पश्चिम महाराष्ट्र :
पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. तर सातारा आणि कोल्हापूरात हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. पश्चिम महाराष्टात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची स्थिती असेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. तर काही सखल भागात पाणी साचण्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे.
मराठावाडा :
मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, जालना आणि धाराशिवमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
हे ही वाचा : तुरूंगातून बाहेर आला पती अन् पत्नीवर घेऊ लागला 'तसला' संशय, दोघांमध्ये उफाळला वाद अन् चाकूने सपासप केले वार
विदर्भ :
तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. नदीजवळील गावातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT
