तुरूंगातून बाहेर आला पती अन् पत्नीवर घेऊ लागला 'तसला' संशय, दोघांमध्ये उफाळला वाद अन् चाकूने सपासप केले वार
crime news : देशभरात अनैतिक संबंधाच्या अनेक घटना आता समोर येऊ लागल्या आहेत. यामध्ये अवैध संबंधातून पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासली गेली आहे. तसेच अनेक संसारही उद्ध्वस्त झाल्याचं दिसून येत आहे. आता अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका पतीने अवैध संबंधाच्या संशयावरून आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे.

बातम्या हायलाइट

देशभरात अनैतिक संबंधाच्या घटना

अवैध संबंधातून पती-पत्नीच्या नात्याला काळिमा

पतीने पत्नीवर चाकूने केले वार

नेमकं घडलं काय?
Crime News : देशभरात अनैतिक संबंधाच्या अनेक घटना आता समोर येऊ लागल्या आहेत. यामध्ये अवैध संबंधातून पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासली गेली आहे. तसेच अनेक संसारही उद्ध्वस्त झाल्याचं दिसून येत आहे. आता अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका पतीने अवैध संबंधाच्या संशयावरून आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. आरोपी पतीने आपल्या पत्नीवर चाकूने सपावर वार केले आहेत. नंतर त्याने आपल्या पत्नीचा गळा चिरून हत्या केली. या हत्येच्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकरण हे गाजियाबादच्या लोणी येथील अंकुर विहार पोलीस ठाणे परिसरातील आहे. आरोपीचं नाव सुमित गुप्ता असे आहे. तर मृत पत्नीचं नाव कविता गुप्ता असे आहे.
हे ही वाचा : मुंबईत हळहळ! भूतबाधा झाल्याचं सांगत भोंदू बाबानं पीडितेला उपचारासाठी बोलावलं, नंतर महिलेवर करत राहिला बलात्कार अन्...
नेमकं काय घडलं?
घडलेल्या घटनेनुसार, सुमित गुप्ताचे लग्न राम पार्क एक्सेटेंशन येथील रहिवासी कविता गुप्ता यांच्याशी झाला होता. लग्नाच्या काही महिन्यानंतर सुमितला हरियाणा पोलिसांनी गोळीबार केल्याच्या प्रकरणात बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर सुमारे 2 वर्षे तुरूंगात राहिल्यानंतर, तो सुमारे दोन महिन्यांपूर्वी जामिनीवर बाहेर आला होता. त्यानंतर त्याची सुटका झाल्यानंतर पोटापाण्यासाठी ऑटो रिक्षा चालवून उदरनिर्वाह करू लागला.
पतीकडून पत्नीवर चाकूने सपावर वार
तुरूंगातून बाहेर आल्यापासून, सुमितने त्याच्या पत्नीशी विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून वाद घालण्यास सुरूवात केली. सोमवारी सायंकाळी पती-पत्नींमध्ये यावरून मोठा वाद उफळला. रागाच्या भरात सुमितने स्वयंपाकघरातून चाकू आणला आणि पत्नीवर सपासप वार केले आणि यातच कविताचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी पोलिसांची धाव
पत्नीने आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे लोक घटनास्थळी दाखल झाले. लोक घटनास्थळी येईपर्यंत पत्नी कविताचा खून झाला होता. लोकांनी तात्काळपणे या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत धारदार चाकू ताब्यात घेतला होता. पीडितेच्या कुटुंबाचे म्हणणं आहे की, कविताने त्यांना सांगितलं की, सुमित तिला चाकू दाखवत धमकावतो.
हे ही वाचा : मुंबई हादरली! नवऱ्याला बायकोसोबत एकांत मिळेना, मुलगी यायची सतत नात्याच्याआड, नंतर गळा दाबून मृतदेह फेकला समुद्रात
दरम्यान, संबंधित प्रकरणात हत्या करण्यात आलेला मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतर त्या अहवालातून खरी माहिती समोर येईल.