'माझे पती आजारी होते म्हणून..." दाजी आणि मेव्हणीने मिळून केली हत्या! अनैतिक संबंध अन् समोर आलं वेगळंच सत्य..
राजस्थानच्या अलवारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे भिवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील फेज-3 भागात एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

बातम्या हायलाइट

दाजी आणि मेव्हणीचे अनैतिक संबंध

दाजी आणि मेव्हणीने मिळून केली पतीची हत्या
Crime News: राजस्थानच्या अलवारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे भिवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील फेज-3 भागात एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असून मृताची पत्नी बॉबी राय आणि तिचा दाजी अनुज चौधरीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी चौकशी केली असता दोन्ही आरोपींनी वेगळीच कहाणी सांगितली. पण सत्य काहीतरी वेगळंच होतं.
भिवाडीमधील सन्तरा कॉलनीच्या एक फ्लॅटमधून 65 वर्षीय गुड्डू रॉय नावाच्या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. शेजारील लोकांना त्या घरातून दुर्गंधी आल्यानंतर त्यांनी लगेच पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि त्यांना गुड्डूचा मृतदेह तिथे आढळला. घरमालक आणि त्याच्या पुतण्याने सांगितलं की गुड्डू राय आणि त्याची पत्नी बॉबी काही काळापासून भाड्याने राहत होते आणि दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. याच संशयावरून पोलिसांनी तपास सुरू केला.
दाजी आणि मेव्हणीने केला गुन्हा कबूल
गुड्डू हा बिहारमधील भागलपूरचा रहिवासी होता. सीसीटीव्ही फुटेज आणि खबरींनी दिलेल्या माहितीवरून मृताची पत्नी आणि तिचा दाजी या दोघांवर पोलिसांना संशय आला. त्यावेळी पोलिसांनी दोघांना अटक केली आणि त्यांची पोलीस स्टेशनमध्ये सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान, काही वेळातच आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल केला.
हे ही वाचा: Govt Job: रेल्वेत नोकरी करायची आहे? मग 'पश्चिम रेल्वे'च्या 'या' भरतीची संधी सोडू नका... लवकरच करा अप्लाय
दोघांनी सांगितली वेगळीच कहाणी
चौकशीदरम्यान आरोपी दाजी आणि मेव्हणीने पोलिसांना एक नवीन आणि धक्कादायक गोष्ट सांगितली. आरोपींनी पोलिसांना सांगितलं की, मृत पावलेला गुड्डू गेल्या काही महिन्यांपासून आजारी होता. त्याच्या आजारपणाच्या उपचारांसह खोलीचं भाडं आणि रेशन यावर खूप खर्च होत होता आणि त्यांच्याकडे तेवढे पैसेही नव्हते. त्यामुळे पती-पत्नीमध्ये जवळपास दररोज भांडणं व्हायची. म्हणूनच दाजी आणि मेव्हणीने मिळून गुड्डूची हत्या केली.
हे ही वाचा: कल्याण-डोंबिवलीची कहाणी: शिंदे-चव्हाण पुढारी असलेल्या KDMC ची एवढी दैना झाली तरी कशी?
दोघांमध्ये अनैतिक संबंध
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुड्डूच्या मृतदेहावर जखमांच्या खुणा होत्या. अनुज चौधरी हा बॉबीच्या काकाच्या मुलीचा पती आहे. तो सुद्धा त्याच घरात राहत होता. तसेच, त्यां दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचं देखील समोर आलं. गुड्डूला त्याच्या पत्नीचे अनुजसोबत अनैतिक संबंध सुरू असल्याचा संशय आला. याच कारणामुळे त्यांच्यात भांडण होऊ लागलं. नंतर बॉबी आणि अनुजने गुड्डूचा काटा काढण्याचं ठरवलं आणि कट रचून त्याची हत्या केली.