मुंबईत हळहळ! भूतबाधा झाल्याचं सांगत भोंदू बाबानं पीडितेला उपचारासाठी बोलावलं, नंतर महिलेवर करत राहिला बलात्कार अन्...

Mumbai Crime : मुंबईत सांताक्रुझमध्ये एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. यात एका महिलेला भूतबाधा झाल्याचे सांगत भोंदूबाबाने अमानुष बलात्कार केला आहे. या प्रकरणात भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली आहे.

mumbai crime
mumbai crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील सांताक्रूझमध्ये मन हेलावून टाकणारा प्रकार

point

भोंदू बाबाने 32 वर्षीय पीडित महिलेवर केले लैंगिक शोषण

point

भोंदू बाबा पोलिसांच्या जाळ्यात

point

नेमकं काय घडलं?

Mumbai Crime : मुंबईतील सांताक्रूझमध्ये मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका भोंदू बाबाने 32 वर्षीय पीडित महिलेला त्रासातून मुक्त करतो असे सांगितले आणि तिच्यावर बलात्कार केला. संबंधित प्रकरणात आरोपी भोंदू बाबा अब्दुल रशीद (वय 45) याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 

हे ही वाचा : फिरायला जाण्याचं महिलेला दाखवलं आमिष, बॉयफ्रेंडने धारदार शस्त्राने केले सात तुकडे, अन् वेगवेगळ्या विहिरीत...

भूतबाधा झाल्याचं सांगत उपचाराच्या नावाने केला बलात्कार 

पीडित महिला ही गेल्या काही काळापासून शारीरिकदृष्ट्या कमजोर होती. याचा फायदा घेत भोंदू बाबा अब्दुल राशीद पीडितेशी अधिक संपर्क साधत राहिला. तुझ्यावर भूतबाधा झाल्याचं भोंदू बाबाने सांगितले. तांत्रिक विधी करून भूतबाधा दूर करता येईल, असा भोंदू बाबाने  सांगितले.   त्यानंतर तिला उपचारासाठी एका ठिकाणी बोलावले. 

संबंधित ठिकाणी बोलावून आरोपी भोंदू बाबा रशीदने तिच्यावर बलात्कार केला. हा एक उपचाराचाच भाग असल्याचा पीडित महिलेचा गैरसमज झाला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं असता, पीडितेनं मंगळवारी सांताक्रूज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असता, पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

भोंदू बाबाविरोधात गुन्हा दाखल 

त्यानंतर सांताक्रूझ पोलिसांनी भारतीय संहितेच्या कलम (64) व (64) 2 अंतर्गत अंधश्रद्धा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर बुधवारी राशीदवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. अशा भोंदू बाबांसारख्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरु लागली आहे. 

हे ही वाचा : मुंबई हादरली! नवऱ्याला बायकोसोबत एकांत मिळेना, मुलगी यायची सतत नात्याच्याआड, नंतर गळा दाबून मृतदेह फेकला समुद्रात

पोलिसांनी नागरिकांना अशा भोंदू बाबांना आणि अंद्धश्रद्धेला कधीही बळी न पाडण्याचे आवाहन केलं आहे. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सांताक्रुझ पोलीस करत असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं सांताक्रुझमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp