फिरायला जाण्याचं महिलेला दाखवलं आमिष, बॉयफ्रेंडने धारदार शस्त्राने केले सात तुकडे, अन् वेगवेगळ्या विहिरीत...
Crime News : फिरायला चल असं सांगत एका माजी सरपंचाने महिलेला गाडीत बसवले. त्यानंतर तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बातम्या हायलाइट

बॉयफ्रेंडकडून महिलेची हत्या

तब्बल सात तुकडे करत विहीरीत फेकलं

धक्कादायक प्रकरण समोर
Crime News : फिरायला चल असं सांगत एका माजी सरपंचाने महिलेला गाडीत बसवले. त्यानंतर तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी सरपंचाने एका महिलेला फिरायला घेऊन जातो असे आमिष दाखवले आणि दोन साथीदारांच्या मदतीने प्रेयसीचे एकूण सात तुकडे करत क्रूरतेची सीमा ओलांडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपींसह दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. एक आरोपी सध्या फरार असल्याचं सांगण्यात येत आहे. संबंधित घटनेचा पोलीस पुढील शोध घेताना दिसत आहेत. आरोपी माजी सरपंचाने नाव संजय पटेल असे असून हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव रचना यादव (वय 35) आहे. ही घटना ही घटना उत्तर प्रदेशातील झांशी येथे घडली आहे.
हे ही वाचा : मुंबई हादरली! नवऱ्याला बायकोसोबत एकांत मिळेना, मुलगी यायची सतत नात्याच्याआड, नंतर गळा दाबून मृतदेह फेकला समुद्रात
आरोपींना अटक तर फरार
आरोपी संजय पटेल आणि त्याचा पुतण्या संदीप पटेल यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी सरपंच संजय पटेलचे हत्या करण्यात आलेल्या रचनाशी दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तिसरा आरोपी प्रदीपला हातीशी घेत रचनाची कट रचून हत्या करण्यात आली. संबंधित प्रकरणात तिसरा आरोपी प्रदीप हा अद्यापही फरार असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस तिसरा आरोपी संजयचा शोध घेत आहे. या प्रकरणात पोलिसांनी गावात पथक पाठवले आणि घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली.
2 वर्षांपासून होते प्रेमसंबंध
संजयची रचनाशी काही वर्षांपूर्वी मैत्री झाली होती. हळूहळू मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि नंतर रचनाने संजयकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहायर करू लागली. दोघांमध्ये 2 वर्षांपासून प्रेमसंबंध सुरु होते. दोन महिन्यांपूर्वी शिवराजचा मृत्यू झाल्यानंतर रचना तिचा तिचा प्रियकर संजयलर लग्न करण्यासाठी दबाण आणू लागली होती. संजयने तिला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला, पण रचनाने या गोष्टीला विरोध केला. यामुळे त्याने रचनाला मारण्याचा कट रचला असता, याच कटात त्याने पुतण्या संदीप पटेल आणि पसौरा गावातील प्रदीप उर्फ दीपक अहिरवार यांना सामील करून घेतलं.
हे ही वाचा : वकिलाने न्यायालयातच लोखंडी गजाला शालेनं घेतला गळफास, कर्मचारी जेवणाचा डब्बा घेऊन आले अन्...सुसाईड नोटबाबत पोलिसांचं मौन
शरीराचे केले सात तुकडे अन्...
संबंधित प्रकरणात 9 ऑगस्ट रोजी संजय, संदीप आणि प्रदीप यांनी रचनाला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने गाडीत बसवले, त्यानंतर संजयने तिला गाडीत बसूनबराच वेळ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण रचना ऐकायचं नावच घेत नव्हती. त्यानंतर संदीपने रचनाचा गळा दाबला आणि तिच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात रचनाच्या शरीराचे तब्बल 7 तुकडे केल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, एकूण सात तुकडे त्यात डोके, पाय आणि शरीराचे इतर भाग हे वेगवेगळ्या विहिरीत टाकण्यात आले.