38 वर्षांच्या मेव्हणीचं 64 वर्षांच्या भाऊजींसोबत जडलं प्रेम! पतीची हत्या केल्यानंतर दोघेही झाले फरार, पण नंतर असं काही घडलं..
Wife Killed Husband Crime News : अलवार जिल्ह्यातील भिवाडी येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एक 38 वर्षांची महिला तिच्या 64 वर्षांच्या भाऊजींच्या प्रेमात पडली अन् नंतर होत्याचं नव्हतं केलं.

बातम्या हायलाइट

महिलेनं पतीची केली निर्घृण हत्या

पोलिसांनी दोन्ही आरोपींना केली अटक

त्या ठिकाणी नेमकं घडलं तरी काय?
Wife Killed Husband Crime News : अलवार जिल्ह्यातील भिवाडी येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एक 38 वर्षांची महिला तिच्या 64 वर्षांच्या भाऊजींच्या प्रेमात पडली अन् नंतर होत्याचं नव्हतं केलं. ती महिला भाऊजीच्या प्रेमात इतकी वेडीपिसी झाली की, तिने तिच्या पतीची हत्याच केली. पती काही दिवसांपासून आजाराने ग्रस्त होता आणि नोकरी करत नव्हता. यामुळे तो दिवसभर घरी दारू प्यायचा.
पोलीस अधीक्षक प्रशांत किशोर यांनी म्हटलंय की, सोमवारी रात्री महिला बॉबीने तिचा पती गुड्डू रायची रस्सीने गळा दाबून हत्या केली. या हत्या प्रकरणात तिचा भाऊजी अनुज चौधरीही सामील होता. हत्या केल्यानंतर दोघेही घर बंद करून फरार झाले. मंगळवार संध्याकाळी पोलिसांना खबर मिळाली की, संतरा कॉलनीत भाड्याच्या खोलीत गुड्डूचा मृतदेह पडला आहे. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी पोहचून दरवाजा तोडला आणि मृतदेह ताब्यात घेतला.
महिलेनं पतीची केली निर्घृण हत्या
गुड्डू जवळपास 15 वर्षांपासून आजारी होता. कुटुंबाची आर्थिक स्थिती खराब होती. त्यामुळे पती-पत्नीत वादविवाद सुरु होते. बॉबी आणि अनुज चौधरी एकाच कंपनीत नोकरी करत होते. याचदरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध सुरु झाले. पती दारू पिऊन बॉबीला मारहाण करायचा, त्यामुळे ती वैतागली होती.
हे ही वाचा >> BEST Election: ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईतल्या निवडणुकीत कशामुळे झाला एवढा दारूण पराभव?
पोलिसांनी दोन्ही आरोपींना केली अटक
हत्या केल्यानंतर बॉबी आणि अनुज बिहार पळून जाण्याच्या तयारीत होते. दोघांनीही ई-मित्रवरून पाच हजार रुपये काढले होते आणि कॉलनीतून बस पकडणार होते. पंरतु, नीलम चौकातून पोलिसांनी दोघांना जवळपास 10 वाजता अटक केली. पोलिसांनी हत्याप्रकरणात वापरण्यात आलेली रस्सी जप्त करण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीने ती रस्सी कचऱ्यात फेकली होती. पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.