Husband And Wife Shocking Viral News : बिहारच्या जहानाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. येथील एका महिलेनं तिच्या पतीवर मानसिक, शारीरिक आणि व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमकीचा त्रास दिल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी महिलेनं सायबर क्राईम ब्रँचमध्ये तक्रार दाखल केली आहे. ही धक्कादायक घटना नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुतबनचक परिसरात घडली. पीडित नाजियाने म्हटलं की, त्यांचं लग्न 2019 मध्ये झारखंडच्या बोकारो जिल्ह्यातील चलकारी गावातील रहिवासी मोहम्मद आविद जफरसोबत झाली होती.
ADVERTISEMENT
त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं?
सुरुवातीच्या दिवसांमध्ये सर्वकाही सामान्य होतं. तसच या दाम्पत्याला एक चार वर्षांची मुलगी आहे. पण काही वेळानंतर पती आणि सासरच्या लोकांकडून हुंड्याची मागणी करण्यात आली. पीडितेच्या माहितीनुसार, लग्नात तिच्या कुटुंबियांनी त्यांच्या क्षमतेनुसार हुंडा दिला होता. पण त्यानंतरही त्यांनी हुंड्याची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्याने तिचा मानसिक छळ करून मारहाण करण्यात आली. त्यामुळे ती सासर सोडून माहेरी कुतवनचक शहरात आली. पीडितेनं म्हटलं की, अनेकदा समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्यावर कोणीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.
हे ही वाचा >> Breaking News: महापालिका निवडणुकांबाबत आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, निवडणूक 'या' महिन्यात होणार?
घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आणि नंतर..
वर्ष 2023 मध्ये नाजियाने जहानाबाद न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर आरोप करण्यात आला की, पती मोहम्मद आविद जफरने नाजियाला मेसेज पाठवून आधी धमकावलं. त्यानंतर बोगस फेसबुक आयडी बनवून त्यावर अश्लील फोटो आणि फोटो पोस्ट करणं सुरु केलं. इतकच नाही, त्याने नाजियाचा मोबाईल नंबरही सार्वजनिक केलं. ज्यामुळे तिला नेहमी अनोळखी व्यक्तींचे कॉल आणि मेसेज येऊ लागले.
पीडितेनं आरोप केला की, हा खटला मागे घेण्यासाठी पतीकडून दबाव टाकण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेनं संबंधीत व्हिडीओच्या कॉपीसह पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली. त्यानंतर सायबर क्राईम पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पीडितेनं आरोपीच्या विरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे.
हे ही वाचा >> मुंबईत हळहळ! भूतबाधा झाल्याचं सांगत भोंदू बाबानं पीडितेला उपचारासाठी बोलावलं, नंतर महिलेवर करत राहिला बलात्कार अन्...
ADVERTISEMENT
