Govt Job: मुंबई हायकोर्टात नोकरीची स्वप्नं पाहणाऱ्या तरुणांसाठी नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून पर्सनल असिस्टंटच्या एकूण 80 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून हायकोर्टात संबंधित पदांवर योग्य आणि मेहनती उमेदवारांची निवड केली जाईल. बऱ्याच काळापासून सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असलेल्या तरुणांसाठी ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
ADVERTISEMENT
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया 18 ऑगस्ट 2025 रोजी सुरू झाली असून इच्छुक उमेदवार 1 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना bombayhighcourt.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडे पदवी (Graduation) ची डिग्री असणं अनिवार्य आहे. तसेच, हायकोर्टात 8 ते 10 वर्षांच्या कार्याचा अनुभव असणं देखील गरजेचं आहे. त्यासोबतच, उमेदवाराकडे हिंदी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, उमेदवारांना न्यायालयाशी संबंधित कागदपत्रे आणि कामकाज सहजपणे हाताळता येण्यासाठी कंप्यूटरचं बेसिक नॉलेज असणं देखील आवश्यक आहे.
हे ही वाचा: गर्लफ्रेंड मध्यरात्री पोहचली बॉयफ्रेंडच्या घरी, पण असं काही घडलं की अख्खा गाव झाला जागा!
वयोमर्यादा आणि वेतन
मुंबई उच्च न्यायालयाच्या या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचं किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 38 वर्षे असणं गरजेचं आहे. तसेच सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. भरतीच्या माहितीनुसार, असिस्टंट पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना 67,700 रुपये ते 2,08,700 रुपये वेतन देण्यात येईल. याव्तिरिक्त, सरकारच्या इतर सुविधा आणि भत्ते देखील नियुक्त झालेल्या उमेदवारांना मिळतील.
निवड प्रक्रिया
या भरतीमध्ये उमेदवारांच्या नियुक्तीसाठी आधी लेखी परीक्षा आयोजित केली जाईल. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखत आणि डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात येईल. याच्या आधारे निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्जाचं शुल्क भरावं लागेल.
हे ही वाचा: 18 वर्षाच्या मुलाला आवडली 50 वर्षांची महिला, थेट करून टाकलं लग्न; घरचे म्हणाले अरे...
अर्ज करण्याची प्रक्रिया
1. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी bombayhighcourt.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. त्यानंतर होमपेजवरील भरतीच्या अर्जाची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
3. आधी उमेदवारांनी लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करा.
4. लॉगिन केल्यानंतर अॅप्लीकेशन फॉर्म भरा.
5. अर्ज भरल्यानंतर तो चेक करून घ्या आणि अर्जाचं शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
6. शेवटी अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट काढा आणि भविष्यासाठी ती सुरक्षितरित्या ठेवा.
ADVERTISEMENT
