गर्लफ्रेंड मध्यरात्री पोहचली बॉयफ्रेंडच्या घरी, पण असं काही घडलं की अख्खा गाव झाला जागा!
मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये प्रियकरासोबत वाद झाल्यामुळे एका तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय.

बातम्या हायलाइट

प्रियकराने प्रेयसीला दिला धोका

तरुणी प्रियकराच्या घरी गेली अन् तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून...
Crime News: मध्य प्रदेशातील इंदौरमधून एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथील सेंट्रल कोतवाली पोलीस स्टेशन परिसरात प्रियकरासोबत वाद झाल्यामुळे एका तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित तरुणी खरगोनची रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर सुदैवाने, ती खाली असलेल्या तारांमध्ये अडकल्याली आणि तिचा जीव वाचला. मात्र, तिच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडिता बुधवारी (20 जुलै) तिचा प्रियकर आवेशच्या घरी गेली होती. त्यावेळी दोघांमध्ये मोठा वाद झाला. आपल्या प्रियकराने एका दुसऱ्याच मुलीशी लग्न केलं असून तो बराच काळ तिला धोका देत असल्याचा आरोप संबंधित तरुणीने केला आहे. त्या दोघांमधील वाद मारहाणीपर्यंत पोहोचला. जेव्हा तरुणीने तिच्या प्रियकराने केलेल्या वाईट कृत्यांबद्दल सांगितलं तेव्हा त्याने तिच्या प्रेयसीचं तोंड दाबून तिला मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील तरुणीने केला.
तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी
प्रियकराच्या अशा वागण्यामुळे पीडिता संतापली. रागाच्या भरात ती इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेली आणि तिथून तिने उडी मारली. तरुणीचा प्रियकर आवेश आणि त्याचे कुटुंबीय ही घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी प्रियकराचे कुटुंबीय तरुणीला अपशब्द वापरत ओरडत असल्याचं देखील दिसून येत आहे. मात्र, पीडिता तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यानंतर कुटुंबीय घाबरले आणि ते तातडीने तरुणीला जवळील रुग्णालयात घेऊन गेले. ही घटना प्रियकराच्या घरच्यांनी लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. तसेच, आवेश म्हणजेच पीडितेच्या प्रियकराने तरुणीच्या मोबाईलमधून त्या दोघांचे चॅट्स आणि इतर पुरावे डिलीट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही वेळानंतर, आरोपी कुटुंबीय पीडितेला रुग्णालयात सोडून तिथून फरार झाल्याचं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा: अनोखी प्रेमकथा! 18 वर्षीय तरुणाने 50 वर्षीय महिलेसोबत केलं लग्न, कुटुंबियांना आणली लाज...
पीडितेने केले गंभीर आरोप
घटनेत जखमी झालेल्या पीडितेने पोलिसांच्या जबाबात दिलेल्या माहितीनुसार, आवेश आणि तिची इंस्टाग्रामवर ओळख झाली असून मागील चार वर्षांपासून ते प्रेमसंबंधात होते. यादरम्यान, आरोपी प्रियकराने पीडितेना लग्नाचं आश्वासन दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले मात्र, लग्नाचं वचन दिल्याप्रमाणे त्याने तिच्यासोबत लग्न केलं नाही. संबंधित तरुणीने यापूर्वी देखील या प्रकरणात एकआयआर दाखल केला होता आणि त्यामुळे आवेश तुरुंगात देखील गेला होता. त्यावेळी आवेशने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर लग्न करण्याचं वचन दिलं होतं, मात्र, त्याने बाहेर पडल्यानंतर दुसऱ्याच मुलीसोबत लग्न केलं. इतकंच नव्हे तर, आरोपी प्रियकराने पीडितेला नशेचे पदार्थ देऊन तिच्यासोबत बळजबरीने वाईट कृत्य केल्याचं तरुणीने सांगितलं.
हे ही वाचा: Personal Finance: जर मला काही झाले तर माझ्या कुटुंबाचे काय होईल? या प्रश्नाचे साधे आणि सरळ उपाय
पोलिसांचा तपास
सेंट्रल कोतवाली पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणीचा जबाब नोंदवला गेला असून पुरावे आणि व्हिडीओच्या तपासानंतर आरोपींवर एफआयआर दाखल करण्यात येईल. सध्या, तरुणीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.