कामवाली ग्लासमध्ये करायची लघुशंका अन् शिंपडायची भांड्यांवर, किळसवाणं काम करणारी महिला कॅमेऱ्यात कैद

बिजनौर जिल्ह्यातील नगीना परिसरात एका व्यापाऱ्याच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीने किसळसवाणं कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे.

व्यावसायिकाच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीचं किळसपाणं कृत्य!

व्यावसायिकाच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीचं किळसपाणं कृत्य!

मुंबई तक

22 Aug 2025 (अपडेटेड: 22 Aug 2025, 02:14 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

घरात काम करणाऱ्या मोलकरणीचं किळसपाणं कृत्य!

point

ग्लासमध्ये लघवी करत ते भांड्यावर शिंपडताना दिसली...

Viral Story: बिजनौर जिल्ह्यातील नगीना परिसरात एका व्यापाऱ्याच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीने किसळसवाणं कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे. व्यावसायिकाच्या घरात काम करणारी मोलकरीण स्वयंपाकघरात ठेवलेल्या भांड्यांवर तिचं मूत्र शिंपडत होती. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पाहून घरातील लोक थक्क झाले. मोलकरणीच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडीओ पाहून लोकांचा घरकाम करणाऱ्या मोलकरणींवरचा विश्वास उडत असल्याचं देखील सांगितलं जात आहे. 

हे वाचलं का?

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सगळंच दिसलं

ही मोलकरीण गेल्या 10 वर्षांपासून संबंधित व्यावसायिकाच्या घरात काम करत होती. पण काही दिवसांपासून तिचं विचित्र पद्धतीचं वागणं घरच्यांना खटकत होतं. अशातच,  कुटुंबियांनी स्वयंपाकघरात गुप्तपणे एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आणि यामध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली. 

हे ही वाचा: Govt Job: आता मुंबई हायकोर्टात मिळवा नोकरी... 'या' पदांसाठी निघाली भरती! कधीपर्यंत कराल अर्ज?

ग्लासमध्ये लघवी करताना दिसली

बुधवारी (20 जुलै) दुपारच्या सुमारास ही महिला भांडी घासत असताना अचानक घरात पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्लासमध्ये लघवी करताना आणि ती स्वयंपाकघरात ठेवलेल्या भांड्यांवर तिचं मूत्र शिंपडत असताना दिसली. कुटुंबियांनी या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पाहिलं असता त्यांना मोठा धक्का बसला. हे फुटेज सोशल मीडियावर काही काळातंच व्हायरल झालं आणि परिसरात चर्चेचा विषय बनला.

हे ही वाचा: गर्लफ्रेंड मध्यरात्री पोहचली बॉयफ्रेंडच्या घरी, पण असं काही घडलं की अख्खा गाव झाला जागा!

संध्याकाळी आरोपी महिला कामावर आल्यानंतर संबंधित कुटुंबातील सदस्यांनी तिला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. चौकशीदरम्यान पोलिसांनी महिलेला या अमानुष कृत्याचे कारण विचारलं आणि चांगला जाब विचारला. पण यावर आरोपी महिला गप्प राहिली. या प्रकरणात कुटुंबियांकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. अशातच, आरोपी महिलेवर कलम 151 अंतर्गत चालान करून कारवाई करण्यात आली आहे. या विचित्र घटनेनं लोकांना धक्का बसला असून घरकाम करणाऱ्या महिलांवरच्या विश्वासावर प्रश्न उपस्थित होत आहेत. 

    follow whatsapp