कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरात दोन्ही गटात तुफान राडा, आधी दगडफेक नंतर वाहनंच पेटवली, पुरोगामी महाराष्ट्राला कोणाची नजर लागली?

Kolhapur News : पुरोगामी महाराष्ट्रातील कोल्हापूरातील सिद्धार्थनगर परिसरात दोन गटात तणाव निर्माण झाला आहे. भारत तरुण मंडळ प्रणीत राजेबागस्वार फुटबॉल क्लबच्या 31 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. दुपारपासून घटनास्थळावरील परिसरात फ्लेक्स, पोस्टर, साउंड सिस्टिम लावण्याच्या कारणावरून स्थानिकांच्यात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

kolhapur news

kolhapur news

मुंबई तक

23 Aug 2025 (अपडेटेड: 23 Aug 2025, 10:22 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूरातील सिद्धार्थनगर परिसरात दोन गटात राडा

point

पुरोगामी महाराष्ट्राला कोणाची नजर लागली?

point

नेमकं घडलं काय?

Kolhapur News : पुरोगामी महाराष्ट्रातील कोल्हापूरातील सिद्धार्थनगर परिसरात दोन गटात तणाव निर्माण झाला आहे. भारत तरुण मंडळ प्रणीत राजेबागस्वार फुटबॉल क्लबच्या 31 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. दुपारपासून घटनास्थळावरील परिसरात फ्लेक्स, पोस्टर, साउंड सिस्टिम लावण्याच्या कारणावरून स्थानिकांच्यात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'या' तारखेपासून बुध ग्रहाचे संक्रमण होणार सुरू, तीन राशींची पाचंही बोटं राहणार तुपात, भरघोस पैसा खेळता राहणार

कोल्हापूरातील सिद्धार्थनगरमध्ये राडा

काही वेळानंतर सर्व परिस्थिती अटोक्यात येईल असं वाटत होतं, पण तसं झालं नाही. उलट रात्री संबंधित प्रकरणात वाद आणखी उफळला गेला. सिद्धार्थनगर परिसरात दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. नंतर दोन्ही गटांनी आणखी हिंसक वळण घेत दगडफेक केली. काही गाड्यांवरही दगडफेक कऱण्यात आली. यादरम्यान, दोन वाहनांना आग लावण्यात आली. दोन्ही पक्षांमध्ये जय भीमच्या घोषणाबाजी करण्यात आल्या होत्या. या घटनेनं परिसरात एकच गोंधळ उडाल्याचं दिसून आलं. यात एकूण 8 जण जखमी झाल्याचं दिसून आले.

200 पोलिसांचा फौजफाटा तैनात

परिस्थिती पाहता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 200 पोलिसांना घटनास्थळी दाखल करण्यास सांगितलं. संबंदित प्रकरणात कोल्हापूरचे एसपी योगेश कुमार गुप्ता म्हणाले की, ही घटना परस्पर गैरसमजातून घडली आहे. त्यांनी लोकांना कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नका आणि शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले.

हे ही वाचा : बॉयफ्रेंडसोबतच्या शारीरिक संबंधापायी महिलेने पतीचा विषयच केला The End, पण मटन सूपमुळे...

पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणात अद्याप कोमालाही अटक करण्यात आलेली नाही. रात्री लक्ष्मीपुरी पोलीस टाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. या घटनेशी संबंधित कारवाई लवकरच केली जाईल, असे पोलिसांचं म्हणणं आहे. या संपूर्ण घटनेमुळे सिद्धार्थनगर आणि आसपासच्या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

    follow whatsapp