'या' तारखेपासून बुध ग्रहाचे संक्रमण होणार सुरू, तीन राशींची पाचंही बोटं राहणार तुपात, भरघोस पैसा खेळता राहणार
astrology : 15 सप्टेंबर रोजी तो आपल्या कन्या राशीत येईल. काही राशीच्या लोकांना बुध आपल्या उच्च राशीत गेल्याने भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे.

1/5
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या संक्रमणाचा काही राशीतील लोकांच्या जीवनावर चांगला बदल घडताना दिसून येतो. अशा परिस्थितीत, ऑगस्टच्या महिन्याच्या अखेरीस बुध ग्रह हा कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल. त्यानंतर, 15 सप्टेंबर रोजी तो आपल्या कन्या राशीत येईल. काही राशीच्या लोकांना बुध आपल्या उच्च राशीत गेल्याने भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे.

2/5
या संक्रमणाचा चांगला परिणाम हा इतर राशीतील लोकांवर होतो. यामुळे आर्थिक लाभ, करिअरच्या दृष्टिकोनातून काही राशीतील लोकांना चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. ज्योतिषांच्या मते, हा बदल तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा देऊ शकतो.

3/5
मिथून राशी :
मिथून राशीतील लोकांसाठी बुध ग्रहाचा कन्या राशीत प्रवेश करणं फायदेशीर मानलं जातं. अधिककरून विद्यार्थ्यांना चांगला लाभ मिळेल. तसेच शेअर बाजारातून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.

4/5
तूळ राशी :
तूळ राशीतील लोकांना याच चांगला फायदा मिळणार आहे. कारण नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात यश मिळू शकते. तसेच आर्थिक स्थिती चांगली राहणार असून मानसिक आरोग्य स्थिर असेल.

5/5
मकर राशी :
बुध ग्रह हा मकर राशीच्या नवव्या घरात प्रवेश करणार आहे जो तुमचे भाग्य उजळवेल. या काळात, दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि बँकेकडून कर्ज मिळणे सोपे होईल. तसेच, तुम्हाला परदेशात नोकरीच्या संधी मिळेल.