ADVERTISEMENT
Delhi Blast : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील लाल किल्ल्यावर कारचा स्फोट झाला होता. तो स्फोट घडवणारा दहशतवादी म्हणून डॉ. उमर मोहम्मद याचे पुलवामा येथील घर सुरक्षा यंत्रणांनी उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर आली आहे. कारवाईचा एक भाग म्हणून सुरक्षा यंत्रणांनी हे पाऊल उचललं आहे. सुरक्षा दलांने परिसराला वेढा घातला आणि संपूर्ण कारवाई नियंत्रित पद्धतीने पार पाडली होती.
हे ही वाचा : Bihar Election Result 2025 Live Update: बिहार विधानसभा निवडणूक निकाल 2025 लाईव्ह, वाचा मिनिट टू मिनिट अपडेट
स्फोटात अनेक महत्त्वाचे खुलासे समोर
या स्फोटात अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत. गुरुवारी फरीदाबादेतील अल-फलाह विद्यापीठाच्या पार्किंगमध्ये या स्फोटाशी संबंधित आणखी एक कार आढळल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही कार डॉ. शाहिद यांच्या नावावर नोंदणीकृत करण्यात आली आहे, ज्यांना व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूलच्या प्रकरणात आधीच अटक करण्यात आली आहे.
मारुती ब्रेझा कारची चौकशी
फरीदाबाद पोलिसांनी सांगितलं की, जम्मू आणि काश्मीर पोलीस विद्यापीठात सापडलेल्या संशयास्पद मारुती ब्रेझा कारची चौकशी करण्यात आली आहे. अशातच संशयास्पद कार आढळल्यानंतर, बॉम्ब पथकाला वाहनाची तपासणी करण्यासाठी पाचारण करण्यात आले. विद्यापीठ कॅम्पसमधील पार्क केलेल्या इतर वाहनांची देखील तपासणी करण्यात आली. तसेच एन्क्रिप्टेड स्वीस अॅप वापरून दहशतवादी कट रचण्यातच आला होता, असे बोलले जात आहे.
तपासातून असे दिसून आले की, स्फोटातील मुख्य आरोपी डॉ. उमर मोहम्मद, डॉ. मुझम्मिल अहमद आणि डॉ. शाहीन शाहिद यांनी एका एन्क्रिप्टेड स्वीस अॅप मेसेजिंग अॅपद्वारे त्यांच्या दहशतवादी मोहिमेचे नियोजन आणि समन्वय साधला होता. स्फोट झालेल्या घटनास्थळावरून मिळालेल्या डीएनए नमुन्यांवर पुष्टी केली की, डॉ. उमरलाल किल्ल्याजवळ स्फोट झालेली पांढऱ्या रंगाची हुंडाई I 20 कार चालवत होते.
खत आणि बियाणे विक्रेता ताब्यात
दरम्यान, गुरुवारी हरयाणा गुन्हे शाखेनं छापे टाकले असता, जिथे पिनांगवा येथील एका खत आणि बियाणे विक्रेत्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी या दुकानातून मोठ्या प्रामाणात एनपीके खत खरेदी केल्याचा संशय अधिकच बळावला गेला. अशातच तपास यंत्रना पथकाने बुधवारी फरीबादामधील खंडावली गावात मॉड्यूलची लाल रंगाची दुसरी कार-फोर्ड इकोस्पोर्ट जप्त केली.
हे ही वाचा : Bihar Election 2025 : मतमोजणी सुरु, बिहारभर कुठे रसगुल्ले तर कुठे 500 किलो लाडू, मिठाई अन्.. निकालापूर्वी जल्लोष
माणसाने जी गाडी पार्क केली होती, त्याला फरीदाबाद पोलिसांनी ताब्यात घेत दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन केली. तपासातून असे दिसून आले की, दहशतवाद्यांनी आयईडीची वाहतूक करण्यासाठी तीन वाहनांची खरेदी करण्यात आली होती. परिणामी, दिल्ली पोलिसांनी शहरातील सर्व पोलीस ठाणे आणि सीमावर्ती भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला.
ADVERTISEMENT











