Bihar Election 2025 : मतमोजणी सुरु, बिहारभर कुठे रसगुल्ले तर कुठे 500 किलो लाडू, मिठाई अन्.. निकालापूर्वी जल्लोष

मुंबई तक

Bihar Election 2025 : बिहार निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी, मिठाई, रसगुल्ले तसेच इतर मिठाईचे वाटप करण्यासाठी दोन्ही एकूण पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी सुरु केली आहे.

ADVERTISEMENT

Bihar Election 2025
Bihar Election 2025
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बिहारमध्ये विजयापूर्वीच मेजवानीची जय्यत तयारी

point

500 किलो लाडूंची ऑर्डर

Bihar Election 2025 : बिहार निवडणुकीच्या निकालाचे अपडेट आता समोर येऊ लागले आहेत. मोतमोजणी सुरु झाली असून बिहारमध्ये नेमकं कोण जिंकणार आणि कोणाचा पराभव होणार? याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. अशातच बिहारमध्ये सरबत, दूध, खमंग मेजवानी पातेल्यांमध्ये बघायला मिळत आहे. निवडणुकीत ज्याचा विजय होईल, त्यासाठी ती मिठाई वाटली जाईल. 

हे ही वाचा : Bihar Election Result 2025 Live Update: बिहार विधानसभा निवडणूक निकालाच्या प्रत्येक क्षणाचे अपडेट

विजयापूर्वीच मेजवानीची जय्यत तयारी

बिहारमध्ये मेजवानीची जय्यत तयारी केली जात आहे. अनंत सिंग जेडीयूकडून निवडणूक लढवत आहेत. तर वीणा सिंग आरजेडीकडून दोघेही बलाढ्य नेते आहेत, परंतु अनंत सिंग यांना विजयाची खात्री असल्याने त्यांच्या निवासस्थानी मोजवनीची तयारी केली जात आहे. हे सर्व बघून बिहारचं राजकारण एका वेगळ्या दिशेला जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

10 हजार लिटर दूध

अनंत सिंग यांच्या घरी 10 हजार लिटर दूध पोहोचले आहे, तसेच मिठाई बनवणारे विविध प्रकारचे मिठाई बनवण्यात व्यस्त आहेत. तसेच किमान 50 हजार लोकांसाठी भव्य मेजवानीची तयारी सुरु करण्यात आली आहे. 

500 किलो लाडूंची ऑर्डर

तर भाजप कार्यकर्त्यांना आपल्या उमेदवारांच्या विजयावर पूर्णपणे विश्वास निर्माण झाला आहे. भाजपच्या छावणीत मिठाई बघायला मिळत आहे. विजय साजरा करण्यासाठी आणि तोंड गोड करण्यासाठी तब्बल 500 किलो मानेर लाडूंची ऑर्डर देण्यात आली आहे. काजू, मनुका, खरबूज आणि बेसनापासून बनवण्यात आलेली बुंदी साखरेच्या पाकात लेपित करून जिभेवर चव रेंगाळत ठेवणारे लाडू तयार केले जात आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp