Delhi car blast First image of suspect Dr Mohammad Umar : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटानंतरचा संशयिताचा पहिला फोटो समोर आला आहे. या फोटोत संशयित व्यक्ती हुंडाई i20 चालवताना दिसत आहे, हीच ती कार जी सोमवारी रात्री स्फोटात खाक झाली होती. या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. माहितीनुसार, मोहम्मद उमर नावाचा संशयित दहशतवादी फरिदाबाद दहशत मॉड्यूलशी संबंधित आहे. तो फरिदाबाद येथील अल फला मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होता.
ADVERTISEMENT
कोण आहे डॉ. मोहम्मद उमर? संपूर्ण माहिती जाणून घ्या...
उमर हा अदील अहमद राथरचा जवळचा सहकारी असल्याचे सांगितले जाते. राथर हा अनंतनाग येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज (GMC) मधील माजी सीनियर रेसिडेंट डॉक्टर असून, गेल्या आठवड्यात त्याला अटक करण्यात आली होती. राथरकडून मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सोमवारी फरिदाबादमध्ये छापा मारला. इंडिया टुडेला मिळालेल्या माहितीनुसार, उमर स्वतः त्या कारमध्ये होता आणि त्याने दोन साथीदारांसह या हल्ल्याचा कट रचला होता. सोमवारी फरिदाबादमध्ये झालेल्या अटकांनंतर घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी हा हल्ला घाईघाईत केला.
उमर आणि त्याच्या साथीदारांनी कारमध्ये डिटोनेटर बसवून हा स्फोट घडवला. तपास यंत्रणांनी पुष्टी केली आहे की, या स्फोटात अमोनियम नायट्रेट फ्युएल ऑइल (ANFO) वापरण्यात आले होते. हा स्फोट संध्याकाळी गर्दीच्या वेळी झाला, जेव्हा लाल किल्ल्याजवळील परिसर पर्यटकांनी गजबजलेला होता. सीसीटीव्ही फुटेजनुसार, हा फोटो सोमवारी संध्याकाळी 6 : 52 वाजण्याच्या काही वेळ आधीचा आहे. ही कार सुमारे तीन तास सुनहरी मशिदी जवळ पार्क करण्यात आली होती. फुटेजमध्ये कार दुपारी 3 : 19 वाजता पार्किंगमध्ये शिरताना आणि संध्याकाळी 6 : 48 वाजता बाहेर पडताना दिसते. त्यानंतर थोड्याच वेळात स्फोट झाला.
सुरुवातीला कार चालकाचा चेहरा स्पष्ट दिसतो, मात्र कार पुढे सरकल्यावर मुखवटा घातलेला माणूस कार चावलताना दिसतो.दरम्यान, आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात ही कार पार्किंगमध्ये येताना आणि जाताना दिसते. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की स्फोटाच्या वेळी संशयित एकटाच होता. तपास यंत्रणा आता दरीयागंजकडे जाणारा मार्ग शोधत आहेत. सध्या 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज, टोल प्लाझांवरील व्हिडिओसह, तपासले जात आहेत जेणेकरून वाहनाची संपूर्ण हालचाल समजता येईल.
कार शेवटची वेळ बडरपूर बॉर्डर मार्गे शहरात प्रवेश करताना दिसली. तिच्या उर्वरित प्रवासाचा तपास सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 13 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
जम्मू-कश्मीरमधील गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार, ही हुंडाई i20 सुरुवातीला मोहम्मद सलमानच्या नावावर होती, ज्याला सोमवारी रात्री अटक झाली. कार नंतर अनेक वेळा विकली गेली — प्रथम नदीमला, त्यानंतर फरिदाबाद सेक्टर 37 मधील रॉयल कार झोन या जुन्या गाड्यांच्या डिलरला....या गाड्यांशी संबंधित लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न झाला असता, त्यांचे सर्व मोबाईल फोन बंद असल्याचे आढळले. यानंतर ही कार आमिरकडे आणि मग तारिककडे गेली. तारिक हा फरिदाबाद दहशत मॉड्यूलचा सदस्य असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शेवटी ही कार मोहम्मद उमरकडे आली. आमिर आणि तारिक या दोघांची सध्या चौकशी सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या घटनांचा परस्पर संबंध असून, मुझमिलच्या अटकेनंतर उमर घाबरला त्यानंतर त्याने किल्ला स्फोट घडवून आणला असावा. या कारच्या मालकाला 20 सप्टेंबर रोजी फरिदाबादमध्ये चुकीच्या ठिकाणी पार्क केल्यामुळे दंड ठोठावण्यात आला होता. कारचे रजिस्ट्रेशन अजूनही सलमानच्या नावावर आहे. तपास अधिकारी कारच्या व्यवहारांचा मागोवा घेत आहेत. ती अजूनही तारिककडे होती की त्याने पुढे विकली, हे तपासले जात आहे. दरम्यान, फॉरेन्सिक पथक डीएनए चाचणी करून स्फोटावेळी कार चालवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवणार आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सूत्रांनुसार, फरिदाबाद क्राइम ब्रँच आणि जम्मू-कश्मीर पोलिसांकडून स्फोटकांबाबतची माहिती मागवण्यात आली आहे. प्राथमिक तपासात स्फोटाच्या ठिकाणी अमोनियम नायट्रेट आढळल्याचे समोर आले आहे. मात्र आज येणारा फॉरेन्सिक रिपोर्ट नेमके रासायनिक स्वरूप स्पष्ट करेल. शकीलच्या साथीदारांचा शोध सुरू असून, अनेक यंत्रणा त्याची चौकशी करत आहेत. चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, आज फरिदाबादमध्ये पुन्हा छापा टाकला जाणार आहे, जिथे जम्मू-कश्मीर पोलिस आधीच तैनात आहेत.स्फोटस्थळावरून मिळालेल्या नऊ मृतदेहांपैकी दोन पुरुषांची ओळख पटली असून, उर्वरित सात जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. एक अतिरिक्त देहाचा भागही सापडल्याने ओळख पटवणे कठीण झाले आहे. त्यामुळे डीएनए चाचणी आणि शवविच्छेदन करून मृतांची ओळख निश्चित केली जाणार आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात गैरकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA)च्या कलम 16 आणि 18 लागू केली आहेत. हे कलम दहशतवादी कृत्ये आणि त्यावरील शिक्षेशी संबंधित आहेत. त्याचबरोबर स्फोटक पदार्थ कायदाच्या कलम 3 आणि 4 तसेच खून आणि खूनाचा प्रयत्न या गुन्ह्यांचाही समावेश केला आहे. या स्फोटात काही वाहने आणि लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या काचांच्या खिडक्या फुटल्या. घटनेनंतर चांदणी चौक बाजार मंगळवारी बंद ठेवण्यात येणार आहे. दिल्लीमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला असून, सर्व सीमांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











