i20 कार 3 तास सुनहरी मशीदजवळ उभी होती, जागेवरुन निघताच अवघ्या 4 मिनिटात... Delhi Car Blast बाबत हादरवून टाकणारी माहिती
Delhi Car Blast बाबत मोठा खुलासा, i20 कार 3 तास सुनहरी मशीदजवळ उभी होती, जागेवरुन निघताच 4 मिनिटांनंतर....
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Delhi Car Blast बाबत मोठा खुलासा
i20 कार 3 तास सुनहरी मशीदजवळ उभी होती
जागेवरुन निघताच 4 मिनिटांनंतर....
Delhi Car Blast i 20 car : देशाची राजधानी दिल्ली सोमवारी (दि.11) कार स्फोटाची हारदली. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात मोठी माहिती समोर आलीये. हुंडाई i20 कार जी या स्फोटात उद्ध्वस्त झाली, ती कार घटनेपूर्वी सुनहरी मशीदजवळील पार्किंगमध्ये तब्बल तीन तास उभी होती. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, ही कार 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 3: 19 वाजता पार्किंगमध्ये आली आणि संध्याकाळी 6 : 48 वाजता तेथून बाहेर पडली. यानंतर अवघ्या चार मिनिटांत म्हणजेच 6 : 52 वाजता नेताजी सुभाष मार्गावरील ट्रॅफिक सिग्नलवर या कारमध्ये भीषण स्फोट झाला. सीसीटीव्ही फुटेजमधून ही माहिती समोर आलीये. या स्फोटात आसपास उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे नुकसान झाले. घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आणि 20 जण जखमी झाले.
स्फोटापूर्वीचा फोटो आणि कारची माहिती
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने स्फोटाच्या काही क्षणांपूर्वीचा एक फोटो जाहीर केला आहे, ज्यात i20 कार सुनहरी मशीदच्या दिशेने जाताना दिसते. नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गावरील ट्रॅफिक सिग्नलवर धीम्या गतीने जात असताना कारच्या मागील भागात (डिकीत) अचानक स्फोट झाला. स्फोट एवढा तीव्र होता की, आसपासच्या अनेक वाहनांचे काच फुटले, गाड्यांना आग लागली, आणि लाल किल्ला मेट्रो स्टेशनचे काचेचे भागही तुटले. ही कार हरियाणातील गुरुग्राम नॉर्थ आरटीओमध्ये नोंदणीकृत (HR 26 7624) होती. ती मोहम्मद सलमान या व्यक्तीच्या नावावर होती. पोलिसांनी सलमानला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. तपासात पुलवामा कनेक्शन असल्याची शक्यता तपासली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, सलमानने ही i20 कार जम्मू-कश्मीरमधील तारिक नावाच्या व्यक्तीस विकली होती.

i20 कारची वारंवार खरेदी-विक्री
ही कार अनेक वेळा खरेदी-विक्री करण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, या व्यवहारांसाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला होता. सुरक्षा यंत्रणांना ही घटना साधी अपघाती वाटत नसून पूर्वनियोजित असल्याचा संशय आहे. या कारवर यावर्षी 15 सप्टेंबर रोजी फरीदाबाद येथे चुकीच्या पार्किंगसाठी 1723 रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. या घटनेत संशय वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे, 9 नोव्हेंबरच्या रात्री जम्मू-कश्मीर आणि फरीदाबाद पोलिसांनी फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर धोकादायक केमिकल जप्त केले होते, ज्याचा वापर स्फोटक बनवण्यासाठी होऊ शकतो.
दिल्ली कार स्फोटाचा संबंध फरीदाबादमध्ये पकडलेल्या धोकादायक केमिकलशी असू शकतो. पोलिसांनी फरीदाबादमध्ये 2,900 किलो IED तयार करण्याचे साहित्य, मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त केला होता होता. ही कारवाई जैश-ए-मोहम्मद आणि अंसर गजवात-उल-हिंद या संघटनांशी संबंधित आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड करताना करण्यात आली होती. या प्रकरणात जम्मू-कश्मीर पोलिसांनी सात जणांना अटक केली असून त्यात दोन डॉक्टरांचा डॉ. मुअजमिल अहमद गनई (फरीदाबाद) आणि डॉ. आदिल (कुलगाम) समावेश आहे.










