नाशिकच्या भाऊला अंत्यसंस्कारासाठी नेलं, पण तेव्हाच भाऊ खोकला अन्..

खाजगी रुग्णालयात तरुणावर उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला ‘ब्रेन डेड’ घोषित केल्याचा कुटुंबियांनी आरोप केला आहे. पण, अंतिम संस्काराची तयारी करत असतानाच त्या तरुण अचानक खोकू लागल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे.

अंत्यसंस्कार होण्यापूर्वी खोकला सुरू झाला अन्...

अंत्यसंस्कार होण्यापूर्वी खोकला सुरू झाला अन्...

मुंबई तक

06 Sep 2025 (अपडेटेड: 06 Sep 2025, 01:28 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

‘ब्रेन डेड’ घोषित केलेला तरुण अचानक खोकू लागला

point

नाशिकमधील धक्कादायक घटना

Shocking Incident: नाशिक जिल्ह्यातून एक चकित करणारी बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी येथील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भाऊ लाचके नावाच्या तरुणाचा रस्त्यावर अपघात झाला होता आणि त्यात तो गंभीर पद्धतीने जखमी झाला होता. त्यानंतर, अडगाव येथील खाजगी रुग्णालयात तरुणावर उपचार सुरू होते. उपचाराअंती डॉक्टरांनी भाऊला ‘ब्रेन डेड’ घोषित केल्याचा कुटुंबियांनी आरोप केला आहे. तरुण मृत पावल्याचं समजून कुटुंबियांनी त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, घरातील लोक अंतिम संस्काराची तयारी करत असतानाच त्या तरुणाची अचानक हालचाल सुरू झाली आणि तो खोकू लागला. हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

हे वाचलं का?

तरुणाची प्रकृती गंभीर.. 

यानंतर कुटुंबियांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेलं, जिथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्याला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे.

कुटुंबियांचे रुग्णालयातील प्रशासनावर आरोप 

पीडित तरुणाचे कुटुंबीय गंगाराम शिंदे म्हणाले की, “आम्ही अंत्यसंस्काराची तयारी करत होतो. तेव्हा अचानक भाऊची हालचाल सुरू झाली आणि त्याने खोकण्यास सुरूवात केली. आम्हाला आमच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. आम्ही तातडीने अँम्ब्यूलन्स बोलावली आणि त्याला जिल्हा रुग्णालयात नेलं.” सध्या, डॉक्टर त्याच्यावर उपचार करत असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.

हे ही वाचा: अरे देवा! तरुणीने दिला लग्न करण्यास नकार... संतापलेल्या तरुणाने तरुणीचं नाकच कापलं अन्...

डॉक्टरांनी काय सांगितलं?   

ज्या खाजगी रुग्णालयात तरुणावर उपचार सुरू होते त्या रुग्णालयाच्या प्रशासनाने कुटुंबियांचे आरोप फेटाळून लावले आहेत. रुग्णालय प्रशासनाच्या मते, भाऊ लचके याला मृत घोषित करण्यात आलं नव्हतं. मेडिकल स्टेटमेंटबाबत कुटुंबीय गोंधळले होते, असं त्यांचं म्हणणं आहे.

हे ही वाचा: Maratha Reservation: एक नाही तर 2 जीआर निघाले ते पण तासाभरात, छगन भुजबळांचे 'मुंबई Tak चावडी'वर गौप्यस्फोट

'ब्रेन डेड' म्हणजे काय?  

साधारणपणे, 'ब्रेन डेड' म्हणजे रुग्णाचा मेंदू काम करणं थांबवतो. खरंतर, अशी परिस्थिती मृत्यूच्या बरोबरीची मानली जाते, परंतु डॉक्टरांचं म्हणणं आहे की अनेक वेळा कुटुंबियांमध्ये याबद्दल गोंधळ असतो. भाऊ लचके याचं प्रकरणही आता असंच काहीसं आहे. कुटुंबातील सदस्यांचं म्हणणं आहे की जर तो तरुण अंत्यसंस्कारापूर्वी हालचाल करत होता आणि खोकत होता, तर डॉक्टरांनी त्याला 'ब्रेन डेड' असं म्हणत त्यांची दिशाभूल का केली? त्याच वेळी, रुग्णालय प्रशासनाचा दावा आहे की त्यांनी कधीही त्या तरुणाला मृत घोषित केलं नाही.

    follow whatsapp