डोंबिवलीत डॉक्टरचे नर्सशी विवाहबाह्य प्रेमसंबंध, 10 बिअर आणि 45 झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न

मिथिलेश गुप्ता

24 Feb 2026 (अपडेटेड: 24 Feb 2026, 06:22 PM)

Dombivali News : डोंबिवलीच्या पश्चिमनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 10 बिअर पित 45 झोपेच्या गोळ्या खाऊन नामांकित रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. संबंधित डॉक्टरचे एका नर्ससोबत प्रेमसंबंध होते, याच कारणाने डॉक्टरने आत्महत्या करत जीवन संपवण्याचा निर्णय घेतला होता. या घटनेनं रुग्णालयासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Dombivali News

Dombivali News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

10 बिअर आणि 45 झोपेच्या गोळ्या खाऊन डॉक्टरांचा आत्महत्येचा प्रयत्न

point

नेमकं काय घडलं? 

Dombivali News : डोंबिवलीच्या पश्चिमनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 10 बिअर पिऊन आणि 45 झोपेच्या गोळ्या खाऊन नामांकित रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. संबंधित डॉक्टरचे एका नर्ससोबत प्रेमसंबंध होते, याच कारणाने डॉक्टरने आत्महत्या करत जीवन संपवण्याचा निर्णय घेतला होता. या घटनेनं रुग्णालयासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : नगर-दौंड महामार्गावर भरधाव आलेल्या ट्रकने कारला चिरडलं, भीषण अपघातात तिघांचा जागीच अंत

नेमकं काय घडलं? 

ही घटना डोंबिवली पश्चिमभागतील विष्णूनगर पोलीस ठाणे हद्दीतील एका रुग्णालयात घडली. संबंधित डॉक्टर आणि त्याची पत्नी देखील डॉक्टरच आहे. दोघेही मिळून रुग्णालय चालवण्याचे काम करत होते. डॉक्टर रुग्णालयात न आल्याने त्यांना अनेकदा फोन करण्यात आले होते, परंतु डॉक्टरांनी फोनच उचलला नाही. तेव्हा कर्मचारी डॉक्टरांच्या घरी गेले असता, डॉक्टर बेशुद्ध अवस्थेत पडले होते. 

डॉक्टरांचे नर्ससोबत प्रेमसंबंध

त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांचे नर्ससोबत प्रेमसंबंध आहे. संबंधित डॉक्टरांचा आणि त्यांच्या पत्नीचा नेहमी वाद व्हायचा. याच वादाला कंटाळून डॉक्टर एका उच्चभ्रू सोसायटीत घर घेऊन राहत होते.

हे ही वाचा : पुणे : बिल्डरच्या फसवणुकीमुळे सेवानिवृत्त अधिकारी नैराश्यात, सातव्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन

10 बिअर आणि 45 झोपेच्या गोळ्या खाऊन डॉक्टरांचा आत्महत्येचा प्रयत्न

त्यानंतर नर्सने डॉक्टरकडे लग्नासाठी तगादा लावला. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, माझं लग्न झाले आहे. तुझ्याशी लग्न कसं करता येईल. त्यानंतर नर्सने डॉक्टरांशी बोलणे बंद केले. याच कारणावरून डॉक्टर व्यथित होऊन त्यांनी 10 बिअर पिऊन 45 झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा निर्णय घेतला, या प्रकरणाचा विष्णूनगर पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली आहे.