गणेश चतुर्थी 2025: “गणपती बाप्पा मोरया” असा जयघोष का केला जातो? ‘मोरया’ शब्दामागचा इतिहास माहितीये?

आपण गणपती बाप्पा म्हटल्यानंतर ‘मोरया’च का म्हणतो? याबद्दल तुम्हाला माहितीये का? खरंतर, याचा संबंध एका गणेशभक्ताशी जोडला जातो. पण, एका भक्ताचं नाव बाप्पासह का जोडलं गेलं असेल? यामागे एक रंजक कथा आहे.

‘मोरया’ शब्दामागचा इतिहास माहितीये?

‘मोरया’ शब्दामागचा इतिहास माहितीये?

मुंबई तक

• 06:00 AM • 27 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

“गणपती बाप्पा मोरया” असा जयघोष का केला जातो?

point

‘मोरया’ शब्दामागचा इतिहास जाणून घ्या.

Ganesh Chaturthi 2025: अवघ्या काही तासांतच गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहाने आणि थाटामाटात साजरा केला जाणार आहे. आता ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ असा जयघोष कानावर पडणार आहे. पण आपण गणपती बाप्पा म्हटल्यानंतर ‘मोरया’च का म्हणतो? याबद्दल तुम्हाला माहितीये का? खरंतर, याचा संबंध एका गणेशभक्ताशी जोडला जातो. पण, एका भक्ताचं नाव बाप्पासह का जोडलं गेलं असेल? यामागे एक रंजक कथा आहे.

हे वाचलं का?

‘मोरया’ शब्दाची अनोखी कथा... 

‘मोरया’ हा शब्द महाराष्ट्रातील चिंचवड गावाशी संबंधित असल्याचं मानलं जातं. सुमारे 600 वर्षांपूर्वी मोरया गोसावी नावाचे एक महान गणेशभक्त येथे राहत होते. 1375 मध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे भगवान गणेशाचे अवतार मानले जात असल्याचे म्हटले जाते. भगवान गणेशाप्रती त्यांची श्रद्धा इतकी खोल होती की दरवर्षी गणेश चतुर्थीला ते चिंचवडपासून सुमारे 95 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगाव येथील मयुरेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी पायी जात असत. वयाच्या 117 व्या वर्षापर्यंत त्यांनी ही परंपरा पाळली.

हे ही वाचा: गणेश चतुर्थी 2025: गणेशभक्तांनो! 10 दिवसानंतरच का करतात गणपती बाप्पाचं विसर्जन? यामागची रंजक कहाणी माहितीये का?

मोरगावच्या मयूरेश्वराने दिला दृष्टांत 

एका प्रसिद्ध कथेनुसार शके 1411 (इ. स. 1489) मध्ये नेहमीप्रमाणे मोरया गोसावी मोरगावला वारीसाठी गेले होते. तेव्हा मोरगावच्या मयूरेश्वराने मोरयांना दृष्टांत दिला ‘‘आता तू वृद्ध झाला आहेस. वारीस येताना तुझे फार हाल होतात, हे मला पाहवत नाही. यापुढे तू वारीला येऊ नकोस. मीच चिंचवडला येतो.’’ दुसऱ्याच दिवशी नदीतील तिसरं स्नान करताना मोरया गोसावी यांच्या ओंजळीत शेंदरी रंगाची मूर्ती आली. त्यांनी ती मूर्ती देऊळवाड्यात आणून, तिची प्राणप्रतिष्ठापना केली.”

हे ही वाचा: गणेश चतुर्थी 2025: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काय बनवायचं? घरीच सोप्या पद्धतीनं बनवा बाप्पाच्या आवडीचे 'हे' 6 पदार्थ

‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष 

मोरया गोसावी यांनी मार्गशीर्ष वद्य षष्ठी शके 1483 (इ.स. 1561) रोजी समाधी घेतली. प्रसिद्ध मोरया गोसावी गणपती देवस्थान आज समाधीच्या ठिकाणी म्हणजेच चिंचवड येथे उभे आहे. कालांतराने या गणेश भक्ताची भक्ती आणि हे मंदिर दूरवर प्रसिद्ध झाले. लोक येथे दर्शनासाठी येऊ लागले आणि भगवान गणेशाचे नाव घेताना त्यासोबत ‘मोरया’ हे नाव जोडू लागले. याच कारणामुळे लोक गणरायाचं नाव घेताना ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष ऐकू येतो.

    follow whatsapp