Shocking Love Story Viral News : कर्नाटकच्या चित्रदुर्ग मध्ये एक धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. 19 वर्षांच्या विद्यार्थीनीचा जळलेला मृतदेह NH-18 हायवेवर आढळला. वरुशिता के.टी. असं या मृत महिलेचं नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आलीय.
ADVERTISEMENT
प्रेम, धोका आणि आजारपणामुळे अशाप्रकारची घटना घडल्याचं समजते. या घटनेचा मास्टरमाईंडही तो व्यक्ती निघाला, ज्याच्यावर वरूशिता प्रेम करत होती. पण या कहाणीत फक्त प्रेम आणि ब्रेकअप नाही, तर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचाही मोठा रोल आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण, जाणून घेऊयात.
त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं?
वरूशिता आणि चेतनच्या प्रेम कहाणीची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली होती. चेतन एक मल्टी-नेटवर्किंग फर्ममध्ये काम करत होता. त्याने वरुशिताला नोकरी देण्याचं वचन दिलं होतं. दोघांमध्ये घट्ट प्रेमसंबंध होते. पण त्याचदरम्यान, चेतनला कॅन्सर झाला. यामुळे दोघांच्या प्रेमसंबंधात फूट पडली. त्यानंतर वारुशिताने दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध सुरु केले. चेतनहा याबाबत कळल्यावर तो प्रचंड रागावला.
हे ही वाचा >> कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरात दोन्ही गटात तुफान राडा, आधी दगडफेक नंतर वाहनंच पेटवली, पुरोगामी महाराष्ट्राला कोणाची नजर लागली?
चेतनने वरुशिताच्या हत्येचा कट रचला आणि..
तपासात समोर आलं की, वरुशिता त्यावेळी 8 महिन्यांची गर्भवती होती. तिचं नवं नातं चेतनला अजिबात आवडत नव्हतं. वरुशिताच्या कुटुंबाने चेतनसोबत लग्नाची चर्चा केली. पण चेतनने त्याला नकार दिला. त्यानंतर त्याने वरुशिताच्या हत्येचा कट रचला. 17 ऑगस्ट रोजी चेतनने वरुशिताला गोनार येथे सुनसान जागेवर बोलावलं.
तिथे दोघांमध्ये वाद झाला आणि चेतनने रागाच्या भरात वरुशिताचा गळा दाबला. त्यानंतर त्याने पेट्रोल टाकून तिचा मृतदेह जाळला. वरुशिताच्या हत्येनंतर लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी न्यायाची मागणी केली. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत आरोपी चेतनला अटक केली.
हे ही वाचा >> विकृतीचं टोक! अल्पवयीन मुलीवर बलात्कार अन् जेल, चौदा वर्षानंतर आला बाहेर अन् दुसऱ्याच पीडितेवर...सुरूच खेळ
ADVERTISEMENT
