Today Gold Rate: बाईई! काय हा प्रकार? सोनं महागलं; खिशाला लागणार कात्री, 24 कॅरेटचा भाव एव्हढा...

Gold Rate Today In India : आज शनिवारी 14 सप्टेंबरला देशात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याची प्रती 10 ग्रॅमची किंमत 74000/75000 हजार आहे. राजधानी दिल्लीत 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव वाढून 74610 रुपये इतका झाला आहे.

आजचे सोन्या चांदीचे दर काय आहेत?

gold-silver prices today 31 august 2024 in maharashtra mumbai pune know the full details

मुंबई तक

14 Sep 2024 (अपडेटेड: 14 Sep 2024, 11:36 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

आज सोन्याच भाव वाचून आश्चर्यच वाटेल

point

देशातील प्रमुख 12 शहरांतील सोन्याचे भाव माहितीयत का?

point

सोनं-चांदीच्या तोळ्याच्या आजच्या किंमतीबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Gold Rate Today In India : आज शनिवारी 14 सप्टेंबरला देशात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याची प्रती 10 ग्रॅमची किंमत 74000/75000 हजार आहे. राजधानी दिल्लीत 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव वाढून 74610 रुपये इतका झाला आहे. तसच चांदीची किंमतही वाढली आहे. चांदी प्रति किलो 89,600 रुपयांवर पोहोचली आहे. देशातील 12 मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची रिटेल किंमत किती आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती. (Today, Saturday, 14 September, the price of gold has increased in the country. The price of 24 carat gold per 10 grams is Rs 74000/75000 thousand)
 

हे वाचलं का?
  • दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत किंमत 68,410 रुपये झाली आहे. तर 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत जवळपास 74,610 रुपये झाली आहे.
  • पटनामध्ये 24 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅमची किंमत 74510 रुपये असून 22 कॅरेटसाठी प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 68,260 रुपये इतकी आहे.
  • कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 74460 रुपये आहे. तर 22 कॅरेटचा प्रति 10 ग्रॅमचा सोन्याचा भाव 68,260 रुपये आहे.
  • भुवनेश्वर आणि हैदराबाद या दोन्ही शहरात 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 74460 रुपये आहे. तर 22 कॅरेटचा 10 ग्रॅमचा भाव 68260 रुपये आहे.
  • अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅमची रिटेल किंमत 68310 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 74510 रुपये आहे.
  • लखनऊमध्ये 24 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम 74,610 रुपयांना विक्री केलं जात आहे. तर 22 कॅरेटचा भाव प्रति 10 ग्रॅम 68410 रुपये आहे. 
  • चेन्नई आणि बंगळुरुत 24 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅंमची किंमत 74,460 रुपये आहे. तर 22 कॅरेटच्या सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 68,260 रुपये आहे. 

सोन्याची शुद्धता कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये शुध्द सोनं किती प्रमाणात आहे, हे कॅरेटच्या प्रणालीनुसार ठरवलं जातं. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

हे ही वाचा >>  Dhananjay Munde : खाद्यतेलावरील आयात शुल्क 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार, सोयाबीन हमीभावाबाबत सरकारचा मोठा निर्णय

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.

हे ही वाचा >> Maharashtra Rain, IMD Alert : घराबाहेर पडताय? जरा जपून...'या' भागात धो धो बरसणार, IMD नं दिला इशारा


 

    follow whatsapp