Dhananjay Munde Tweet : सोयाबीन हमीभावाबाबत केंद्र सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय
Dhananjay Munde latest Tweet : खाद्यतेलावरील आयात शुल्क 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार, सोयाबीन हमीभावाबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत 90 दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयीबन खरेदी केंद्र सुरु करण्यास मान्यता दिली होती.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
राज्याचे कृषमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केल्या तीन मागण्या
खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढवण्याचा सरकारचा निर्णय
"सोयाबीनचे उत्पन्न बंपर होणार"
Dhananjay Munde latest Tweet : खाद्यतेलावरील आयात शुल्क 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार, सोयाबीन हमीभावाबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत 90 दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयीबन खरेदी केंद्र सुरु करण्यास मान्यता दिली होती. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. अशातच मुंडे यांनी सोयाबीनच्या प्रश्नाबाबत ट्वीटरवर मोठी अपडेट शेअर केली आहे. (the central government had approved the establishment of convenience buying centers in the states of Maharashtra and Karnataka with minimum guaranteed price for 90 days)
धनंजय मुंडे ट्वीटरवर काय म्हणाले?
राज्यात सोयाबीनचा पेरा ५२ लाख हेक्टरपेक्षा जास्त झाला असल्याने तसेच यावर्षी पाऊस पाणी व्यवस्थित झाले असल्याने सोयाबीनचे उत्पन्न बंपर होणार आहे . अशावेळी शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, यासाठी मी केंद्राकडे सातत्याने 3 मागण्या करत आहे. त्यामध्ये सोयाबीनची हमीभावाने खरेदी करावी, खाद्यतेल, सोया मिल्क, सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यास शुल्क लावावे आणि सोयाबीन निर्यातीसाठी प्रत्येक क्विंटलमागे किमान 50 डॉलर इतके अनुदान द्यावे.
केंद्र शासनाने यापैकी हमीभावाने खरेदी ही मागणी मान्य केली असून 90 दिवस खरेदी केली जाणार आहे. त्यासोबतच आता खाद्यतेलावरील आयात शुल्क 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही केलेल्या 3 पैकी 2 मागण्या मान्य केल्याबद्दल मी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चव्हाण, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल, तसेच या निर्णयासाठी सातत्याने आग्रह धरणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांचे मनस्वी आभार मानतो.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
केंद्र सरकारने सोयाबीनच्या आधारभूत किंमतीबाबतही नुकताच महत्त्वाचा निर्णय घेतला. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आभारभूत किंमत प्रति क्विंटल 4,892 रुपये निश्चित केली. मुंडे यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे याविषयी सातत्याने पाठपुरावा केला. मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचेही आभार मानले आहेत.
माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळावा, यासाठी मोठे निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सोयाबीन खरेदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कांद्याची मिनिमम निर्यात शुल्क पूर्णपणे हटवण्यात आली आहे. बासमती राईस एक्स्पोर्टवरील शुल्क काढण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीन, कापूस, बासमती राईस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT