Govt Jobs : ITBP मध्ये विविध पदांसाठी भरती, काय आहेत पात्रतेचे निकष?

मुंबई तक

• 04:18 PM • 30 Sep 2026

आयटीबीपीमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 27 ऑक्टोबर आहे. या पदांसाठी पात्रतेचे निकष काय आहेत, जाणून घ्या सविस्तर.

ITBP Recruitment

ITBP Recruitment

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

ITBP मध्ये विविध पदांसाठी भरती

point

काय आहेत पात्रतेचे निकष?

ITBP Recruitment : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) दलात विविध पदांच्या 37 जागा भरण्यासाठी अधिकृत भरती जाहीर करण्यात आली आहे. यात हेड कॉन्स्टेबल (एज्युकेशन अँड स्ट्रेस काउन्सेलर) पदाच्या 16 जागा आणि हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) पदाच्या 21 जागांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेद्वारे पात्र उमेदवारांना भारतीय सीमा सुरक्षा दलामध्ये सेवा बजावण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली असून, निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती संपूर्ण भारतात कुठेही केली जाऊ शकते.

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता काय?

या भरतीसाठी पदांनुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल (एज्युकेशन अँड स्ट्रेस काउन्सेलर) पदासाठी उमेदवाराकडे मानसशास्त्र विषयासह पदवी किंवा बॅचलर ऑफ एज्युकेशन (B.Ed.) / बॅचलर ऑफ टीचिंग (B.T.) ची पदवी असणे आवश्यक आहे. तर हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) पदासाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण असावा, सोबतच आयटीआय (मोटर मेकॅनिक) व 3 वर्षांचा अनुभव किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा असणे गरजेचे आहे.

हे ही वाचा : मुंबईत लग्न, मग दुसरं अफेअर; लिव्ह इनमधून झालेल्या बाळासोबत काय केलं?

वेतन किती मिळणार?

वयोमर्यादेचा विचार करता, 27 ऑक्टोबर 2026 रोजी पहिल्या पदासाठी वय 20 ते 25 वर्षे आणि दुसऱ्या पदासाठी 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे. शासकीय नियमांनुसार एससी/एसटी (SC/ST) उमेदवारांना 5 वर्षे आणि ओबीसी (OBC) उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या पदांसाठी सातव्या वेतन आयोगानुसार पे मॅट्रिक्स 25,500 ते 81,100 या श्रेणीत आकर्षक वेतन आणि इतर भत्ते दिले जातील.

हे ही वाचा : हातोडा, पक्कड, दोरी घेऊन तरुण नीलम गोऱ्हेंच्या बंगल्यात घुसला.., नेमकं काय घडलं?

अर्जाची शेवटची तारीख

या भरतीसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून अर्जाची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर आहे. परीक्षा शुल्क म्हणून जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस (GEN/OBC/EWS) उमेदवारांना 100 रुपये फी भरावी लागेल, तर एससी, एसटी आणि माजी सैनिकांसाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. इच्छुक व पात्र उमेदवारांनी वेळेत अधिकृत संकेतस्थळाला (www.itbpolice.nic.in) भेट देऊन आपला अर्ज सादर करावा.