मुंबईत लग्न, मग दुसरं अफेअर; लिव्ह इनमधून झालेल्या बाळासोबत काय केलं?

मुंबई तक

chhatrapati sambhajinagar crime news : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक महिन्याच्या बाळाच्या कथित खरेदी-विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 1.20 लाख रुपयांपासून सुरू झालेला कथित व्यवहार पुढे 3.50 लाख रुपयांपर्यंत पोहोचला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मुंबईत लग्न, मग दुसरं अफेअर;

point

लिव्ह इनमधून झालेल्या बाळासोबत काय केलं?

chhatrapati sambhajinagar crime news :मुंबईत लग्न झाल्यानंतर पतीसोबत वाद झाल्याने एक महिला मुलीला आणि पतीला मुंबईतच सोडून माहेरी छत्रपती संभाजीनगरला आली. त्यानंतर तिचे योगेश कांबरे नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघे सुमारे तीन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. या काळात सुमारे तीन महिन्यांपूर्वी संभाजीनगरच्या सरकारी रुग्णालयात त्यांना मुलगा झाला. मात्र, बाळाच्या जन्मानंतर काही काळातच त्याचा कथितरीत्या 1 लाख 20 हजार रुपयांना सौदा करण्यात आल्याचा प्रकार पोलिसांच्या तपासात समोर आला आहे. या प्रकरणात मुलाच्या आईसह सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा : "ठाण्यात एका महिन्यात 5 हत्या, गृहमंत्र्यांचा लज्जास्पद कारभार"; शिवसैनिकाच्या हत्येनंतर राऊतांचा संताप

1 लाख 20 हजार रुपयांना विकलं

पोलिसांच्या माहितीनुसार, मुलाच्या पालकांनी त्याला सीमा नावाच्या महिलेकडे कथितरीत्या 1 लाख 20 हजार रुपये घेऊन दिले. कुटुंबाला मुलाचा सांभाळ करणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याचे कारण सांगण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली. यासंदर्भात मुलाची देखभाल करण्यास असमर्थ असल्याचा उल्लेख असलेला बॉन्डही देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, तपास पुढे गेल्यानंतर मुलाला एका कुटुंबाकडे सोपवण्यात आल्यापुरतीच ही बाब मर्यादित नसल्याचे समोर आले. पोलिसांच्या तपासानुसार, मिळालेल्या पैशांपैकी सुमारे 62 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि दोन ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करण्यात आल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा : 'खाई त्याला खवखवे..', निवडणूक आयोगाची बाजू घेणाऱ्या भाजपला राज ठाकरेंचं म्हणीतून प्रत्युत्तर