'खाई त्याला खवखवे..', निवडणूक आयोगाची बाजू घेणाऱ्या भाजपला राज ठाकरेंचं म्हणीतून प्रत्युत्तर
Raj Thackeray on BJP : 'खाई त्याला खवखवे..', निवडणूक आयोगाची बाजू घेणाऱ्या भाजपला राज ठाकरेंचं म्हणीतून प्रत्युत्तर ..नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'खाई त्याला खवखवे..', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
निवडणूक आयोगाची बाजू घेणाऱ्या भाजपला राज ठाकरेंचं म्हणीतून प्रत्युत्तर
Raj Thackeray on BJP, मुंबई : 'विरोधकांना त्यांच्या अपयशाचं खापर निवडणूक आयोगावर फोडायचं आहे. म्हणून विरोधक आयोगाला टार्गेट करत आहेत', असा आरोप भाजपकडून विरोधकांवर करण्यात येतोय. भाजपच्या या आरोपाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. "मराठीत एक म्हण आहे खाई त्याला खवखवे.. आम्ही निवडणूक आयोगावर बोलतोय. भाजपवाल्यांना का त्रास होतोय?" असं राज ठाकरे म्हणाले. तर चोराच्या मनात चांदणे..अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. शिवतीर्थ येथे ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा : 'ती' फेसबुक पोस्ट अन् श्रुती मराठे विद्याधर जोशींवर चांगलीच भडकली; म्हणाली, "घरात बसून.."
ठाकरे बंधूंचा निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चा कुठून - कुठपर्यंत?
राज ठाकरे म्हणाले, चार तारखेला संयुक्त मोर्चा निघेल.. Richardson & Cruddas या कंपनीजवळून म्हणजे भायखळ्यावरु हा मोर्चा निघेल. मुंबई महापालिकेजवळ आल्यानंतर या मोर्चाचं रुपांतर सभेत होईल. त्या ठिकाणी व्यासपीठ असेल. सकाळी 10 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल. लोकं जमेपर्यंत साधारण 11-11.30 वाजता हा मोर्चा निघेल. हा निवडणूक आयोगाच्या विरोधातील मोर्चा आहे. तुम्हाला आठवत असेल गेली अनेक वर्ष आम्ही या विषयामध्ये बोलत आलो आहोत. 2017-2018 मध्ये मी यासंदर्भात अनेक नेत्यांना भेटलो होतो.ईव्हिएम मशीच्या संदर्भात देखील भेटलो होतो. आम्ही आयोगाच्या संपूर्ण विषयावर मोर्चामध्ये बोलणार आहोत. आता बोललो तर परत परत त्याच त्याच गोष्टी बोलल्या जातील. मोर्चानंतर त्याची रुपरेषा कशी असेल? हे आम्ही ठरवू..
हेही वाचा : सफाई कर्मचाऱ्यांना सापडला कुजलेला मृतदेह, पोलीस तपासात भयंकर हत्याकांडाचा उलगडा
