सफाई कर्मचाऱ्यांना सापडला कुजलेला मृतदेह, पोलीस तपासात भयंकर हत्याकांडाचा उलगडा

मुंबई तक

बेंगळुरुमध्ये एका महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला. सुरुवातीला हा मृतदेह बेवारस असावा असं वाटत होतं. मात्र पोलिसांनी कपड्यावरील एका टॅगवरुन या हत्याकांडाचा उलगडा केला.

ADVERTISEMENT

Bengaluru Crime
Bengaluru Crime
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

सफाई कर्मचाऱ्यांना सापडला कुजलेला मृतदेह

point

पोलीस तपासात भयंकर हत्याकांडाचा उलगडा

Crime News : बेंगळुरूमध्ये एका रिकाम्या प्लॉटच्या साफसफाईदरम्यान कर्मचाऱ्यांना एका महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला. सुरुवातीला हा प्रकार केवळ एक बेवारस मृतदेह सापडण्यापुरताच वाटत होता, मात्र पोलिसांच्या तपासात ही तब्बल तीन आठवड्यांपूर्वी झालेली क्रूर हत्या असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला अटक केली असून, आर्थिक विवंचनेतून झालेल्या भांडणातून ही हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

प्रेमविवाहानंतर बेंगळुरुमध्ये  स्थायिक

मूळचा बिहारचा असलेला 32 वर्षीय सागर चंद्र रावत हा बेंगळुरूमधील एका हॉटेलमध्ये काम करत होता, तर त्याची 28 वर्षांची पत्नी अनसुया बेहरा एका कपड्यांच्या दुकानात नोकरी करत होती. प्रेमविवाह झाल्यानंतर दोघेही काही महिन्यांपूर्वीच बेंगळुरूमध्ये स्थायिक झाले होते. 11 ऑगस्टच्या रात्री दोघांमध्ये पैशांवरून जोरदार वाद झाला, ज्यानंतर सागरने अनसुयाचा गळा आवळून खून केला. हत्येनंतर सागरने मृतदेह लागलीच न फेकता तब्बल तीन दिवस घरातच लपवून ठेवला आणि नंतर तो चादरीमध्ये गुंडाळून संपिगेहल्ली येथील एका निर्जन प्लॉटमध्ये फेकून दिला.

हे ही वाचा : कॉकरोच जनता पार्टीला शिवाजी पार्कवर आंदोलन करण्याची परवानगी का नाकारली?

सफाई कर्मचाऱ्यांना आढळला कुजलेला मृतदेह

2 सप्टेंबर रोजी स्थानिक प्रशासनाकडून रिकाम्या प्लॉटची स्वच्छता मोहीम राबवली जात असताना सफाई कर्मचाऱ्यांना हा कुजलेला मृतदेह आढळून आला. भटक्या कुत्र्यांनी मृतदेहाचे नुकसान केल्यामुळे महिलेची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, मृतदेहाजवळ सापडलेल्या एका कपड्याच्या टॅगमुळे पोलिसांना महत्त्वाचा सुगावा मिळाला. या टॅगच्या आधारे एका मॉलपर्यंत पोहचून पोलिसांनी मृत महिलेची ओळख अनसुया बेहरा अशी पटवली आणि तिचा पती सागर याच्यावर संशय बळावला.

हे ही वाचा : दुहेरी हत्याकांडाने बारामती हादरली, दोन महिलांना गळा चिरुन संपवलं

'जणू काही घडलेच नाही'

पत्नीची हत्या केल्यानंतरही सागर अतिशय सामान्यपणे हॉटेलमधील आपल्या कामावर जात होता, जणू काही घडलेच नाही. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. संपिगेहल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करत आरोपी पतीला अटक केली असून, न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.