"ठाण्यात एका महिन्यात 5 हत्या, गृहमंत्र्यांचा लज्जास्पद कारभार"; शिवसैनिकाच्या हत्येनंतर राऊतांचा संताप
Sanjay Raut on Pradeep Purnekar Murder Case : ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात पाच संशयितांची नावे समोर आली असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
"ठाण्यात एका महिन्यात 5 हत्या, गृहमंत्र्यांचा लज्जास्पद कारभार";
शिवसैनिकाच्या हत्येनंतर राऊतांचा संताप
Sanjay Raut on Pradeep Purnekar Murder Case, ठाणे : ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. मनोरमानगर परिसरात त्यांच्या कार्यालयाजवळ ही घटना घडली. हेल्मेट आणि मास्क घातलेल्या हल्लेखोरांनी पूर्णेकर यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
हेही वाचा : गर्भवती काकीसोबत लिव्ह इनमध्ये रहायचा, तरुणाला वेगळाच संशय आला अन् घडंल थरारक हत्याकांड
गोळीबारासोबतच धारदार शस्त्रानेही हल्ला करुन शिवसैनिकांची हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप पूर्णेकर हे त्यांच्या कार्यालयात बसले होते. त्यावेळी दोन हल्लेखोर कार्यालयात घुसले. त्यांनी पूर्णेकर यांच्यावर अनेक राऊंड गोळीबार केला. यातील दोन गोळ्या पूर्णेकर यांना लागल्या. गोळीबारासोबतच त्यांच्यावर धारदार शस्त्रानेही हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हल्लेखोरांनी हेल्मेट आणि मास्क घातले असल्याने त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या हल्ल्यात नेमके किती जण सहभागी होते आणि त्यांच्याकडे कोणत्या प्रकारची शस्त्रे होती, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
हेही वाचा : ठाणे हादरलं, ठाकरे गटाच्या विभागप्रमुखांची गोळ्या झाडून हत्या, प्रदीप पुर्णेकरांना क्रूरपणे संपवलं
