ठाणे हादरलं, ठाकरे गटाच्या विभागप्रमुखांची गोळ्या झाडून हत्या, प्रदीप पुर्णेकरांना क्रूरपणे संपवलं

मुंबई तक

Pradeep Purnekar murder case : ठाण्यातील मानपाडा परिसरात शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्यावर गोळीबार आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. आणखी काही आरोपींचा शोध सुरु आहे.

ADVERTISEMENT

Pradeep Purnekar murder case
Pradeep Purnekar murder case
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

ठाणे हादरलं, ठाकरे गटाच्या विभागप्रमुखांची गोळ्या झाडून हत्या

point

प्रदीप पुर्णेकरांना क्रूरपणे संपवलं

Pradeep Purnekar murder case : ठाण्यातील मानपाडा परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची गोळीबार आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करुन हत्या करण्यात आलीये. गणेश नगर येथील त्यांच्या कार्यालयात हा हल्ला झाल्याची माहिती आहे. हल्लेखोरांनी पुर्णेकर यांच्यावर दोन राऊंड गोळीबार केल्यानंतर धारदार शस्त्रांनीही हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. गंभीर जखमी झालेल्या पूर्णेकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ठाण्यात खळबळ उडाली असून हल्ल्यामागील कारण आणि हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

हेही वाचा : ‘पैशांचा पाऊस पडेल', असं सांगितलं अन्... भुरट्या टोळीकडून 92 लाखांच्या नोटा जप्त

हत्या प्रकरणात पाच जणांचा सहभाग असल्याचा संशय

या प्रकरणात पोलिसांनी पप्या शिंदे आणि आकाश निमसे या दोघांना ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात एकूण पाच जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. निखिल यादव, पप्या शिंदे, आकाश निमसे, संतोष कनोजिया आणि आणखी एक अनोळखी व्यक्ती अशा पाच संशयितांची नावे समोर आली आहेत. उर्वरित संशयितांचा शोध घेण्यासाठी क्राईम ब्राँचसह पोलिसांची नऊ पथके तैनात करण्यात आली आहेत. घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला जात आहे. दरम्यान, पूर्णेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला असून त्यात चेहऱ्याला रुमाल बांधलेले दोन जण दुचाकीवरून पूर्णेकर यांच्या कार्यालयाच्या दिशेने जाताना दिसत आहेत.

हेही वाचा : पाठीवर टॅटू, विषारी मशरुमचा प्लॅन... एक नाही अनेक भयंकर गोष्टींचं प्लॅनिंग, केतनला संपवण्यासाठी सियाच्या डोक्यात होत्या भलत्याच गोष्टी